काही महिन्यांपूर्वीपर्यंत रिषभ पंत आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही अशी चर्चा होती. परंतु आता टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर होण्याच्या काही तासांपूर्वी तो उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. आगामी 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषक होणार असून त्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिषभ पंतला पुन्हा एकदा भारतीय संघाचा उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं. डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात जखमी होण्यापूर्वी पंत भारतीय संघाचा उपकर्णधार होता. पंतनं जून 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचं कर्णधारपदही सांभाळलं होतं. शिवाय टी-20 विश्वचषकासाठी यष्टिरक्षक म्हणून पंतला पहिली पसंती असल्याचं मानलं जातंय.
रिषभ पंतसाठी उपकर्णधारपदाचा मार्ग इतका सोपा नसेल. कारण या शर्यतीत स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याही आहे. मात्र आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक आतापर्यत सपशेल अपयश ठरला, ज्याचा फायदा पंतला होताना दिसतोय. कर्णधार म्हणून पांड्याच्या काही निर्णयांवर टीकाकारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तसेच तो चाहत्यांच्या टीकेचाही धनी ठरला आहे. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार होता. तो आक्रमक फलंदाजीसह वेगवान गोलंदाजी करू शकतो, जे त्याच्या पथ्थ्यावर पडतं. हार्दिकचा टी20 विश्वचषक संघात समावेश होणार जवळपास निश्चित असलं तरी तो उपकर्णधार होणार की यावर याची चर्चा सुरू आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, टी20 विश्वचषकात कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे टॉप ऑर्डरमध्ये असतील, तर रिषभ पंत, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांना मधल्या फळीत स्थान मिळेल. शिवम दुबे आणि रिंकू सिंग या दोघांना किंवा कोणत्याही एका खेळाडूला स्थान मिळू शकतं. त्याचबरोबर संजू सॅमसन किंवा केएल राहुलला संधी मिळू शकते.
कुलदीप यादवचा स्पेशालिस्ट फिरकीपटू म्हणून समावेश केला जाईल. तर दुसऱ्या फिरकीपटूसाठी अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या युजवेंद्र चहल यांच्यात स्पर्धा आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांची जागा निश्चित आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
3 असे खेळाडू ज्यांचा प्रथमच टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश होऊ शकतो
टी20 वर्ल्डकपसाठी संजू सॅमसनला पहिली पसंती, पंत-राहुलला मिळणार डच्चू?
आयपीएल दरम्यानच टी20 वर्ल्ड कपसाठी रवाना होणार टीम इंडिया, तारीख आली समोर