भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. पंतला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळायचा आहे. कसोटी सामन्यासाठी पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे निश्चित मानले जात आहे. पंत हा एक मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावाचा खेळाडू आहे, असे अनेकदा म्हटले जाते. पंतच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे, पण त्याच्या कारकिर्दीची सुरुवात खूपच खडतर राहिली आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये पंत गुरुद्वारांमध्ये झोपायचा, असेही अनेकजण सांगतात. याच कारणास्तव पंत आज जरी भारताचा एक मोठा खेळाडू बनला असला, तरी त्याला सर्वसामान्य आणि गरिबांच्या परिस्थितीची चांगलीच जाण आहे. ध्रुव मतादे नावाच्या पंतच्या एका चाहत्याने ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये हा चाहता आणि त्याचे पंतसोबचे सेल्फी घेताना दिसत आहेत.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये ध्रुवने लिहिले आहे की, “रिषभ पंतविषयी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. जेव्हा आम्ही त्याच्यासोबत एक फोटो घेण्यासाठी विचारले, तेव्हा तो म्हणाला की, काही वेळात पुन्हा माघारी येतो. नंतर तो जवळच्याच एका पुलाखाही बसलेल्या, ज्याला स्वतःचे घर नाहीये, अशा व्यक्तिजवळ गेला. त्याला खाण्यासाठी काहीतरी दिले आणि असेही म्हटला की, अजून काही पाहिजे असेल, तर सांगा. काय माणूस आहे पंत !”
https://twitter.com/_thepolestar/status/1542097847524655104?s=20&t=4fk2JgXP6DAsH65VHTNzgA
दरम्यान, पंतच्या चाहत्याने केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. चाहते पंतच्या या मोठेपणाचे कौतुक करत आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने मायदेशात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळली. पंतला या मालिकेत संघाचा कर्णधार बनवले गेले होते. परंतु कर्णधारपदाच्या रूपात त्याला चांगले प्रदर्शन करता आले नाही. असे असले तरी, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कसोटी सामन्यापूर्वी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात त्याने ७६ धावांची खेळी केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तब्बल ३६ वर्षानंतर एजबस्टन कसोटीमध्ये बुमराहमुळे घडू शकतो ‘तो’ योगायोग
नर्व्हस नायंटीजचा शिकार झाला असता हुड्डा; कसा वाचला सामन्यानंतर सांगितले मित्राला
सनथ जयसूर्यासाठी वाढदिवस आहे खास, ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवलाय अव्वल क्रमांक






