भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आपल्या फलंदाजी आणि यष्टीमागील कामगिरीने सर्वांचेच मनोरंजन करत असतो. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यादरम्यान पंतने यष्टीमागे अप्रतिम स्टंट करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने केलेल्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, सामन्यादरम्यान रिकामा वेळ मिळाल्यावर पंत मस्ती करण्याच्या मूडमध्ये होता. आपल्यापुढे कर्णधार विराट कोहली उभा असल्याचे पाहून त्याने अप्रतिम स्टंट करून दाखवला. त्याच्या शानदार स्टंटला पाहून, विराटने त्याचे तोंडभरून कौतुक केले.
https://www.instagram.com/p/CL_E18DgBOt/
सोशल मीडियावर पंतचे अनेक व्हिडिओ होत आहेत व्हायरल
रिषभ पंत आक्रमक फलंदाज असला तरी तो मैदानाबाहेर आपल्या गमतीदार स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. याआधी देखील त्याचे गमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन सुंदरनेदेखील रिषभ पतंचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये संघाचे जिम सेशन सुरू असताना पंत स्पायडरमॅनसारखा जमिनीवर चालताना दिसत होता. हा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. यासोबतच तो यष्टीमागे सतत काही ना काही बोलत सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतो.
इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर संपुष्टात
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स, मोहम्मद सिराजने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ : मोहम्मद सिराजच्या भेदक चेंडूवर बेअरिस्टो निरुत्तर, पायचीत होऊन परतला तंबूत
धोनीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केली तोबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
या ५ खेळाडूंनी मारले आहेत सलग ६ चेंडूत ६ षटकार; दोन भारतीयांचा आहे समावेश





