---Advertisement---

अरे किती घाई! स्टंपिगच्या गडबडीत पंतकडून सुटला विलियम्सनचा झेल, गोलंदाज अश्विननं मुरडलं नाक

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 10:26 AM
---Advertisement---

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारी (२२ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबाद संघाने स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे या संघासमोर विजय मिळवून स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान होते. परंतु गुणतालिकेत टॉप-३ मध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाची विजय मिळवण्याची आशा धुळीस मिळवली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

दरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाची गोलंदाजी सुरू असताना कर्णधार रिषभ पंतने एक मोठी चूक केली होती. ज्यामुळे आर अश्विनने त्याच्यावर संताप व्यक्त केला होता.

आर अश्विन हा दिल्ली कॅपिटल्स संघातील एक अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघातील फलंदाजांना बाद करण्याची मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली. परंतु आर अश्विनच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने सोपा झेल सोडला होता, ज्यामुळे आर अश्विन संतापला होता.

तर झाले असे की, सनरायझर्स हैदराबाद संघाची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी ९ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर अश्विनने कॅरम बॉल टाकला, जो केन विलियमसनला कळालाच नाही. त्यावेळी तो चेंडू बॅटचा कडा घेत यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हातात गेला होता. परंतु केन विलियम्सनला यष्टीचीत करण्याच्या घाईत असलेल्या रिषभ पंतने हा सोपा झेल सोडल्यानंतर आर अश्विन नाखुश असल्याचे देखील पाहायला मिळाले होते.

केन विलियमसनला या डावात दोन वेळेस जीवनदान मिळाले. अश्विननंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर देखील तो बाद होता होता वाचला. अक्षरने टाकलेल्या चेंडूवर त्याने कव्हरच्या दिशेने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षण करत असलेल्या पृथ्वी शॉच्या हातात गेला. परंतु त्यालाही हा झेल टिपता आला नव्हता. दोन जीवनदान मिळूनही केन विलियमसन मोठी खेळी करू शकला नाही. तो अवघ्या १८ धावा करत माघारी परतला.

सनरायझर्स हैदराबाद संघाला या सामन्यात ९ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ गडी राखून पूर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या-

लाईव्ह सामन्यात ‘तिला’ पाहून दर्शकांची खुलली कळी; म्हणाले, ‘सनरायझर्सला सपोर्ट करण्याचं एकमेव कारण’!

टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका, ‘हा’ धाकड अष्टपैलू जायबंदी; आयपीएलदरम्यान झाली दुखापत

Video: पंत जिथे मनोरंजन तिथे! हवेत उडालेली रिषभची बॅट परत करताना विलियम्सनलाही आवरेना हसू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---