---Advertisement---

धोनी नाही, ना संगकारा ना इतर कुणी; विक्रमाच्या ‘या’ खास यादीत केवळ पंत आणि गिलख्रिस्ट

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 12:54 AM
capetown rishabh 100
---Advertisement---

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्याची कसोटी मालिका (sa vs ind test series) खेळली जात आहे. मालितील तिसरा आणि निर्णायक सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळला जातोय. दक्षिण अफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. हे वर्चस्व केपटाऊन कसोटीत अधिक जाणवले. तरीही सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) याने स्वतःचे शतक पूर्ण केले आणि ऑस्ट्रेलियाच्या एका माजी दिग्गजाशी बरोबरी केली आहे.

रिषभ पंतने या सामन्यातील पहिल्या डावात ५० चेंडूत २७ धावा केल्या होत्या, परंतु दुसऱ्या डावात त्याने स्वतःची कमाल दाखवली. सामन्याच्या दुसऱ्या डावात पंतने १३९ चेंडूंचा सामना केला आणि नाबाद १०० धावा केल्या. त्याने या धावा सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने केल्या. या खेळीनंतर पंत एकप्रकारे दक्षिण अफ्रिकेतीत कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.

या सामन्यात त्याने केलेल्या शतकानंतर तो आतापर्यंत दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याने माजी कर्णधार एमएस धोनीला देखील या बाबतीत मागे टाकले आहे. रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) हे केवळ दोन खेळाडू आहेत, ज्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि भारत याठिकाणी स्वतःचे कसोटी शतक पूर्ण केले.

दरम्यान, रिषभ पंतच्या शतकाच्या मदतीने भारतीय संघ दुसऱ्या डावात कसाबसा २०० धावांच्या जवळ पोहोचला. दुसऱ्या डावात भारताने १९८ धावा केल्या आणि सर्व खेळाडू तंबूत परतले. तत्पूर्वी, पहिल्या डावात भारताने २२३ आणि दक्षिण आफ्रिकेने २१० धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताने १३ धावांची आघाडी घेतली होती. तर, आता दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण अफ्रिकेने दोन विकेट्सच्या नुकसानावर १०१ धावा केल्या आहेत. विजयापासून त्यांचा संघ अजून १११ धावांच्या अंतरावर आहे.

महत्वाच्या बातम्या – 

जिथे कॅमेरा पोहोचेना तिथे पोहोचला पंतचा षटकार आणि सुरु झाली चेंडूची शोधाशोध; पाहा व्हिडिओ

इंग्लंडचा सर्वात महत्वपूर्ण खेळाडू ‘या’ अटीवर नोंदवणार आयपीएलसाठी नाव

SAvsIND, 3rd Test, Live: तिसऱ्या दिवसाखेर यजमानांची झुंज; भारताच्या विजयाच्या आशा कायम

व्हिडिओ पाहा –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---