भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. याचदरम्यान बीसीसीआयने अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये रिषभ पंतने आपल्या खास इंस्टाग्राम पोस्टबद्दल खुलासा एक केला आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर ‘फोन हॅक’ चा एक सेगमेंट व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रिषभ पंतला त्याच्या फोनशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये दिसते की रिषभ पंतला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, त्याची आवडती इंस्टाग्राम पोस्ट कोणती आहे. त्यावर त्याने उत्तर देत सांगितले की, एमएस धोनीकडून मिळालेली वनडे कॅप. जी त्याच्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि त्याने तो क्षण इंस्टाग्रामवर शेअर केला होता, जो त्याचा सर्वात आवडता फोटो आहे.
इंस्टाग्रामवरील पोस्टबद्दल रिषभ पंत म्हणाला की, ‘मला माही भाईकडून वनडे कॅप मिळाली. त्याच्याकडून कॅप घेणे हे माझ्यासाठी खूप खास होते. कारण माझे नेहमी त्याच्याकडेच लक्ष असायचे. जर मला काही विचारायचे असेल, मैदानावर किंवा मैदानाबाहेर, मी त्याच्याकडे जात होतो. त्याच्याकडून मिळालेली वनडे कॅप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि त्यामागे खूप खास भावना आहे.’
रिषभ पंतकडे गेल्या काही वर्षांपासून नेहमीच भारतीय संघातील धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जाते. तसेच धोनी आणि पंत यांच्यातील नात्याकडे गुरु-शिष्याप्रमाणेही पाहिले जाते. तसेच अनेकदा पंत मैदानाबाहेरही धोनीच्या संपर्कात असलेला दिसून आला आहे.
Most used emoji 😆
Favourite selfie pose 🤔
Favourite Instagram post 📱We played a fun segment of Phone Hack with #TeamIndia wicketkeeper @RishabhPant17 & he had some interesting responses 👌 – by @RajalArora
A special feature with him coming soon on https://t.co/uKFHYdKZLG 📽️ pic.twitter.com/esNUal66FQ
— BCCI (@BCCI) July 31, 2021
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्याला आणखीही काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यात एक प्रश्न असा विचारण्यात आला की, तू उठल्यावर फोनमध्ये आधी काय चेक करतोस? या प्रश्नाला उत्तर देत रिषभ पंत म्हणाले की, ‘अगोदर अलार्म वाजतो, बास मी फक्त त्याला पाहतो.’
त्याचबरोबर रिषभ पंतला त्याच्या आवडत्या सेल्फी पोज आणि इमोजीबद्दल ही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो उत्तर देत म्हणाला की, ‘मला सेल्फी काढायला अजिबात आवडत नाही. शक्यतो मी इतर लोकांना फोटो क्लिक करायला सांगतो. माझी आवडती इमोजी स्माईल आहे.’
रिषभ पंतला शेवटी एक प्रश्न विचारण्यात आला की, कोणत्या प्रकारचे फोटो काढायला आवडतात? यावर तो म्हणाला की, ‘मला निसर्गाचे फोटो काढायला खूप आवडतात.’
सध्या रिषभ पंत भारतीय संघासोबत कसोटी मालिकेची तयारी करत आहे. नुकताच तो कोरोनातून बरा झाला आहे. आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रिषभ पंतकडून मोठ्या धावांच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचे असे ४ स्टार क्रिकेटर जे लवकरच घेऊ शकतात टी२० क्रिकेटमधून निवृत्ती
‘राहुल चाहर मला राशिद खानची आठवण करून देत आहे’, पाहा कोणी केलीये तुलना
“भारताच्या विकेट पडत होत्या, माझी मुले मला शिव्या देत होती” टी२० मालिकेतील पराभवावर भडकला सेहवाग