भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा फलंदाजी करत असताना विरोधी संघातील गोलंदाजांचा घाम काढून चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. परंतु जेव्हा तो यष्टीच्या मागे असतो; तेव्हा देखील तो काही-ना-काही मजेशीर कृत्य करून चाहत्यांचे आणि खेळाडूंचे मनोरंजन करताना दिसून येत असतो. इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या (७ ऑगस्ट) दिवशी त्याने मजेशीर कृत्य केले आहे. जे बघून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, दुसऱ्या डावात इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूट आणि जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत होते. त्यावेळी ५१ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला होता. शमीच्या पहिल्याच चेंडूवर बेअरस्टोने चौकार मारला आणि इंग्लंड संघाने १५० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर पुढच्या चेंडूवर शमीने अप्रतिम चेंडू टाकला. मात्र चेंडू बेअरस्टोच्या बॅटमधून हुकला आणि रिषभ पंतच्या हातात गेला.
त्यावेळी कर्णधार कोहली आणि रोहित शर्मा हे पंचांकडे बेयरस्टो झेलबाद झाल्याची मागणी करत होते. इतक्यात चेंडू पकडुन झाल्यानंतर रिषभ बेडकासारख्या उड्या मारत रोहितच्या जवळ गेला. हे पाहून रोहित आणि कर्णधार कोहली हे दोघेही आश्चर्यचकित झाले होते.
— Jon | Michael | Tyrion (@tyrion_jon) August 7, 2021
रिषभ पंत या सामन्यात फलंदाजी करत असताना मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला असला; तरी देखील त्याने यष्टीमागे चांगली कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात एकूण ३ झेल टिपले. त्याने डॉम सिब्ले, जॅक क्राउली आणि जो रूट या तिन्ही फलंदाजांचे झेल टिपले. हे तिन्ही झेल त्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर टिपले. इंग्लंड संघाचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपुष्टात आला आहे.(Rishabh pant funny moment in first test against England,watch Virat and rohit’s funny reaction)
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५७ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाच्या (७ ऑगस्ट) समाप्तीपर्यंत भारतीय संघाला १ बाद ५२ धावा करण्यात यश आले आहे. पहिल्या डावात ८४ धावांची खेळी करणारा केएल राहुल या डावात २६ धावा करत माघारी परतला आहे. तर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे दोघेही प्रत्येकी १२-१२ धावा करत मैदानावर टिकून आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुलचे ‘लेडी लक’, अथियाने स्टेडियममधून केले चीयर; फलंदाजाने नॉटिंघम कसोटीत चोपल्या ११० धावा
शूsss! बेयरस्टोला तंबूत धाडल्यानंतर सिराजने दाखवला ‘स्वॅग’, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
संघ सहकाऱ्याचा डिविलियर्सवर गंभीर आरोप; म्हणाला, ‘तो माझा हिरो होता, पण त्याने माझ्यासोबतच…’






