भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येत्या काही दिवसात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघामध्ये ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. तसेच युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. परंतु तो आता फिट होऊन पुन्हा मैदानात सराव करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशातच तो मिळालेल्या रिकाम्या वेळेचा देखील आनंद घेताना दिसून येत आहे. ज्याचे फोटो त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. यावर त्याच्या गर्लफ्रेंडने प्रतिक्रिया दिली आहे.
रिषभ पंत हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो काही ना शेअर करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. नुकताच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रंगीत वस्त्र परिधान करून काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो घोड्यासोबत मस्ती करताना दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो बागेत चालताना दिसून येत आहे.
या फोटोवर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीने कमेंट करत “क्युटेस्ट रेंबो” असे लिहिले आहे. हे कमेंट करण्यामागचे कारण असे की, रिषभने या फोटोमध्ये रंगीत वस्त्र परिधान केले आहेत.(Rishabh pant gf isha Negi comment on rishabh pant instagram post)
https://www.instagram.com/p/CRv7OZvN0iZ/?utm_medium=copy_link
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. यादरम्यान भारतीय संघातील खेळाडू मौज मस्ती करताना दिसून आले होते. याच दरम्यान रिषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे त्याला भारतीय संघासोबत डरहॅमला जाता आले नव्हते. तसेच योग्यरित्या उपचार घेतल्याने तो आता पूर्णपणे ठीक झाला आहे.
इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याची गरज
रिषभ पंत याने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत देखील तो चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सर्वात इंग्लंडमधूनच केली होती. आता त्याच्याकडे भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची उत्तम संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जीवाभावाची मैत्री! फुटबॉल खेळताना दिसले रणवीर अन् माही, एकमेकांची गळाभेट घेत केली मस्ती
पाकिस्तानबरोबर पाच नव्हे, तर चारच टी२० सामने खेळणार वेस्ट इंडिज, ‘या’ कारणामुळे बदलले टाईमटेबल
चित्त्यासारखी चपळता, अचूक निशाणा; संधी मिळताच इशानने शनाकाला केले यष्टीचीत, झाली धोनीची आठवण






