विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत उतरेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर मिळालेली सुट्टी संपवून सर्व भारतीय खेळाडू पुन्हा एकदा बायो-बबलमध्ये सामील झाले आहेत. यादरम्यान कोरोनामुक्त होऊन आता पूर्णपणे तंदुरुस्त झालेला यष्टीरक्षक रिषभ पंत हा सोशल मीडियावर वेळ घालवताना दिसतोय. त्याने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आपल्याला नवीन मित्र मिळाल्याचे सांगितले.
रिषभला मिळाला नवा मित्र
भारतीय संघाला मिळालेल्या सुट्टीच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्याने यष्टीरक्षक रिषभ पंतला लंडन येथे क्वारंटाईन व्हावे लागले होते. त्यातुन बरा झाल्यानंतर तो २२ जुलै रोजी डरहॅम येथे भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये सामील झाला. त्यावेळी भारतीय संघातील सदस्यांनी त्याचे स्वागत केले होते.
सरावाला सुरुवात करण्यापूर्वी रिषभ पंतने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका घोड्यासोबत दिसत आहे. त्याने या व्हिडिओला ‘मला नवा मित्र मिळाला’ असे कॅप्शन दिले. या व्हिडिओमध्ये रिषभ रंगीबेरंगी जॅकेट घातलेला दिसत आहे. याव्यतिरिक्त रिषभने या जॅकेटवरील काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ज्यावर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगी हीने ‘क्युटेस्ट रेनबो’ अशी कमेंट केली आहे.
https://www.instagram.com/p/CRuIXwVCMeF/
चांगल्या फॉर्ममध्ये आहे रिषभ
रिषभ पंत सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या ऐतिहासिक मालिका विजयात रिषभने मोलाचे योगदान दिलेले. त्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत त्याने आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना संघाला पहिल्या क्रमांकावर पोहचवलेले. रिषभने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात इंग्लंडमधूनच केली होती. त्यामुळे या दौऱ्यातदेखिल त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या फॅन्सने केले सीएसके चाहत्यांना ट्रोल, पाहा मजेदार मीम
‘तर, मी असो किंवा अन्य कोणी, तुम्हाला संघाबाहेर बसावेच लागेल’, चहलचे मोठे भाष्य
महिला हॉकी सामन्यात जर्मनीने भारताला पाजलं पराभवाचं पाणी; बुधवारी ब्रिटनला देणार आव्हान