बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडू दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये खेळत आहेत. आतापर्यंत ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर या भारतीय खेळाडूंना विशेष प्रदर्शन करता आले नाही. दुसरीकडे यष्टीरक्षक रिषभ पंत मात्र भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे.
रिषभ भारत ब संघाकडून दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहे. जिथे त्याने भारत अ संघाविरुद्ध यष्टीमागे अप्रतिम झेल घेतला. त्याच्या या झेलची सध्या खूप चर्चा होत आहे. बीसीसीआय डोमेस्टिकने रिषभच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
पंतचा दमदार झेल
दुलीप ट्रॉफी 2025 चा पहिला दिवस खूपच रोमांचक होता, तर दुसऱ्या दिवसाचा खेळ सरासरी राहिला. दरम्यान, भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक रिषभचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवदीप सैनी गोलंदाजी करत आहे आणि मयंक अग्रवाल फलंदाजी करत आहे. मयंक अग्रवालने नवदीप सैनीचा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, पण यष्टीच्या मागे उभ्या असलेल्या पंतने चेंडू बॅटला लागताच चपळता दाखवली आणि डायव्ह मारत झेल घेतला. परिणामी मयंक अग्रवालला पॅव्हेलियनला परतावे लागले.
Terrific delivery 🔥
Excellent catch 👌
Navdeep Saini bowled a peach to dismiss Shubman Gill and Rishabh Pant pulled off a superb diving catch to remove Mayank Agarwal.#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/z1cCHONjCI
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 6, 2024
टीम इंडियात परतण्यासाठी सज्ज
भारतीय संघातील काही खेळाडू सध्या विश्रांतीवर आहेत. तर काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत आहेत. भारतीय संघ 19 सप्टेंबरपासून ॲक्शनमध्ये दिसणार आहे, जिथे भारतीय संघाचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे पुनरागमन अपेक्षित आहे. कार अपघातानंतर पंत कसोटी संघापासून दूर आहे, मात्र आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळाल्यास तो जवळपास 2 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करेल. पंतने शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.
हेही वाचा –
विजय थलपतीच्या ‘GOAT’ सिनेमांत धोनीची झलक, एका सीनसाठी थिएटरचे झाले स्टेडियम!
“भारतीय संघात सध्या दर्जेदार फिरकीपटू नाहीत”, वीरेंद्र सेहवागचे वादग्रस्त विधान!
भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?