इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मधील दिल्ली कॅपिटल्स संघाने मंगळवारी (३० मार्च) १४व्या मोसमातील कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाला असल्याने तो यावर्षी आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला संघाचा नवा कर्णधार म्हणून निवडले आहे. या स्पर्धेत तो दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद मिळवणारा १२वा खेळाडू आहे.
साल २००८ मध्ये जेव्हा प्रथमच आयपीएलचे सामने खेळले गेले होते तेव्हा या संघाचे कर्णधारपद माजी भारतीय सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या ताब्यात होते. परंतु यावर्षी दिल्लीकडून घरगुती क्रिकेट खेळणार्या रिषभ पंतला आता संघाची कमान देण्यात आली आहे. संघाचे नेतृत्व करणारा तो १२वा कर्णधार असणार आहे. सेहवाग ते रिषभ पंत यांच्यामध्ये आणखी कोणत्या कोणत्या खेळाडूंनी संघाचे कर्णधार भूषवले आहे ते पाहूया.
वीरेंद्र सेहवाग जेव्हा कर्णधार होता तेव्हा दिल्ली संघाचे नाव दिल्ली डेअरडेव्हिल्स असे होते. २००८ ते २०१२ पर्यंत त्याने दिल्ली संघाची धुरा सांभाळली. दरम्यान गौतम गंभीरला २००९ आणि २०१९ मध्ये संघाचा कर्णधार बनविण्यात आले. नंतर दिनेश कार्तिकने २०१० ते २०१४ या काळात संघाचे नेतृत्व केले. त्याच वेळी, जेम्स होप्सने २०११ मध्ये संघाचे नेतृत्व स्वीकारले.
त्यानंतर २०१२ आणि २०१३ मध्ये महेला जयवर्धने याने दिल्लीचे नेतृत्व केले. डेव्हिड वॉर्नरने देखील २०१३ मध्ये काही काळासाठी या संघाच्या नेतृत्वाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर पुढच्या वर्षी केव्हिन पीटरसनने २०१४ मध्ये संघाचे नेतृत्व केले. त्याचवेळी २०१५-१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जेपी ड्युमिनीने संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. २०१६-१७ मध्ये माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानला संघाचा कर्णधार बनविण्यात आले. करुण नायर यानेही काही काळ दिल्लीची कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे.
मात्र २०१८ मध्ये गंभीरने कर्णधार पद सोडल्यानंतर श्रेयस अय्यरला संघाचा कर्णधार बनविण्यात आले होते. परंतु आता अय्यर अनुपलब्ध असल्याने रिषभला ही जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईच्या इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने २६ वर्ष आणि २७ दिवसांचे वय असताना विजेतेपद जिंकले होते. परंतु रिषभ पंतचे सध्याचे वय २३ वर्ष आहे आणि जर तो यावर्षी त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाला आयपीएलचा चषक मिळवून देऊ शकला तर आयपीएलचे विजेतेपद जिंकवून देणारा सर्वात तरुण कर्णधार ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुंबई इंडियन्ससह या तीन बलाढ्य टीम्सला मोठा धक्का, चार खेळाडू पहिल्या काही सामन्यातून बाहेर
तर सचिन-गांगुली भारतीय संघात दिसलेच नसते, पाहा विरेंद्र सेहवगाने कुणावर साधलाय निशाणा
आयपीएलमधून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरने दिल्लीच्या नवनियुक्त कर्णधार रिषभ पंतला अशा दिल्या शुभेच्छा