टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू रिषभ पंत लवकरच रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना दिसू शकतो. पंतसोबत विराट कोहलीच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. परंतु सध्या कोहलीबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. दिल्ली रिषभ पंतकडे कर्णधारपद सोपवू शकते. तो 23 जानेवारीपासून सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरू शकतो.
‘टाईम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, दिल्ली जिल्हा आणि क्रिकेट असोसिएशन शुक्रवारी संघाची घोषणा करेल. या यादीत पंतचं नाव समाविष्ट होऊ शकतं. पण विराट कोहलीबाबत अद्याप कोणतीही अपडेट मिळालेली नाही. कोहलीला अलिकडेच मुंबईत स्पॉट करण्यात आलं होतं. तो मुंबईहून अलिबागला गेला होता.
टीम इंडियाकडून पंत आणि कोहलीसह, दिल्लीनं हर्षित राणाचं नावही अतिरिक्त खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलं होतं. या खेळाडूंची निवड त्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. त्यामुळे पंत खेळू शकतो. तर विराट कोहलीबद्दल अद्याप कोणतंही अपडेट मिळालेलं नाही. हर्षित राणा रणजीसाठी उपलब्ध राहणार नाही. तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 मालिकेचा भाग आहे.
रिषभ पंतनं आतापर्यंत प्रथम श्रेणीत 4868 धावा केल्या आहेत. या काळात त्यानं 11 शतकं आणि 24 अर्धशतकं झळकावली. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 308 धावा आहे. पंतनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावलं आहे. त्यानं 67 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1789 धावा केल्या आहेत. या काळात त्यानं 2 शतकं आणि 11 अर्धशतके झळकावली.
नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत रिषभ पंत पूर्णपणे फ्लॉप झाला होता. या मालिकेत भारतीय फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर रोहित शर्मा, रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल सारखे स्टार फलंदाज देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतले आहेत.
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? बीसीसीआय मोठा बदल करण्याच्या तयारीत
कोण बनणार भारताचा पुढील बॅटिंग कोच? सेहवागसह या माजी खेळाडूंचे नावं चर्चेत
इंग्लंडच्या माजी खेळाडूला व्हायचंय भारताचा बॅटिंग कोच, टीम इंडियाविरुद्ध ठोकल्या आहे खोऱ्यानं धावा