---Advertisement---

IND vs SL शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ‘या’ खेळाडूचं होणार संघात पुनरागमन?

On: सोमवार, ऑगस्ट 5, 2024 9:07 PM
Kuldeep Yadav, Virat Kohli, Rishabh Pant
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. त्यातील दोन सामने खेळले गेले. पहिला सामना बरोबरीत सुटला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं 32 धावांनी शानदार विजय मिळवला. 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता भारताला तिसरा सामना जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे. शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजी फ्लाॅप ठरली. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकतात.

भारत आणि श्रीलंका मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना (7 ऑगस्ट) रोजी होणार आहे. हा सामना कोलंबो मैदानावर रंगणार आहे. भारताला सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे टॉप ऑर्डरमध्ये एकही डावखुरा फलंदाज नाही. पहिल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं, तर दुसऱ्या सामन्यात शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं.

यानंतर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना फलंदाजीची संधी मिळाली, कारण दोघंही उजव्या हातानं फलंदाजी करतात. वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली, पण ते किमान चौथ्या क्रमांकाचे फलंदाज नाहीत. दरम्यान, जर रिषभ पंत (Rishabh Pant) संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असता तर ही अडचण आली नसती, तो नियमित चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो.

रिषभ पंतचा (Rishabh Pant) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र त्यानंतरही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यासाठी भारताकडे मजबूत पर्याय नाही. सुंदरनं पहिल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 4 धावा केल्या, तर शिवम दुबेला खातंही उघडता आलं नाही.

आता पुढच्या एकदिवसीय सामन्यात पंतला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिल्यास चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणं सोपं होण्याची शक्यता आहे. पण संघातून कोणाला हाकलले जाईल, असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. यष्टिरक्षक म्हटलं तर केएल राहुल (KL Rahul) बाहेर जाईल, पण श्रेयस अय्यरला वगळण्याची शक्यता आहे. या दोघांपैकी एकाला संघातून बाहेर काढले जाऊ शकतं

महत्त्वाच्या बातम्या-

SLvsIND : तिसरी वनडे जिंकत टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी, पूर्ण होऊ शकतं खास ‘शतक’
पदकाचं स्वप्न भंगल…!!! मलेशियाच्या खेळाडूनं बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला केलं चितपट
इशान किशन पुनरागमनासाठी सज्ज, 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘या’ प्रतिष्ठित स्पर्धेत खेळताना दिसणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---