भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट टप्प्यावर आहे. त्यातही मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीनंतर तो अजूनच प्रकाशझोतात आला आहे. कोरोनातून महामारीतून पूर्णपणे सावरल्यानंतर आता तो ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तत्पुर्वी त्याने आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. दरम्यान आपल्याला प्रेरित करणाऱ्या वरिष्ठांची नावेही त्याने सांगितली आहेत.
बीसीसीआय टिव्हीशी आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना तो म्हणाला की, “मला वाटते की हा एक अद्भुत प्रवास आहे. कारण, यामध्ये बरेच चढ-उतार आले आहेत. मात्र, माझ्यासाठी हा उत्कृष्ट अनुभव होता. एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही विकसित होता, तुमच्या चुकांमधून शिकता, स्वतःमध्ये सुधारणा करता, मैदानावर पुनरागमन करत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहता.”
पुढे बोलताना रिषभने सांगितले की, “मला आनंद आहे की. मी माझ्यातून चुकांमधून शिकत गेलो. मला जेव्हाही संधी मिळाली, तेव्हा मी त्या संधीचा लाभ उठवला. या प्रवासादरम्यान मला माझ्या संघ सहकाऱ्यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन आणि संघ प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून मी सदैव काही ना काही शिकण्याच्या प्रयत्नात असतो.”
“मी रोहित भाईसोबत खूप बोलत असतो. मागच्या सामन्यात आपल्याकडून काय चूका झाल्या. पुढील सामन्यात आपण काय करू शकतो. मी माझ्या खेळात अजून कोणत्या नव्या गोष्टी जोडू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टींवर आमचे बोलणे होत असते. विराट भाईकडून मी फलंदाजीच्या तंत्राबद्दल ज्ञान घेत असतो. खासकरुन इंग्लंडविरुद्ध यष्टीच्या पुढे आणि यष्टीमागे कशी कामगिरी करता येईल, याबद्दल आमची चर्चा झाली आहे,” असे त्याने सांगितले.
Preparations for #ENGvIND series 👌
Learning from #TeamIndia seniors 👍
Fond memories of 2018 England tour 👏Ahead of the England Tests, @RishabhPant17 reflects on his cricket journey & more 😎 – by @RajalArora
Watch the full interview 🎥 🔽https://t.co/BKsuDS3afT pic.twitter.com/QFEVW3I69h
— BCCI (@BCCI) July 31, 2021
प्रशिक्षक शास्त्रींविषयी बोलताना तो म्हणाला की, “रवी भाईंसोबत तर माझी खूप चर्चा होत असते. त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळले आहे. ऍश भाई (अश्विन) गोलंदाज असल्यामुळे त्याला माहिती असते फलंदाजाच्या डोक्यात काय चालले आहे. त्यामुळे मी एका फलंदाजाच्या रुपात त्याला बोलतो. जेणेकरुन माझ्यापुढील गोलंदाज काय विचार करत असेल, याचा अंदाजा मला लागू शकेल. एकंदरीत मी संघातील प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करतो.”
महत्वाच्या बातम्या-
चहलची पत्नी रंगली ‘बचपन का प्यार’च्या रंगात, व्हायरल गाण्यावर पार्टनरसंगे लगावले ठुमके; बघा व्हिडिओ
विक्रमवीर बाबर आजम! वेस्ट इंडिजविरुद्ध झुंजार अर्धशतक झळकावत विराट-रोहितवरही ठरला वरचढ
आयपीएलप्रेमींसाठी मोठी खुशखबर, उर्वरित हंगामासाठी उपलब्ध राहणार ‘या’ देशाचे खेळाडू