24 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी बुधवारी दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने 16 जणांचा दिल्लीचा संघ जाहीर केला आहे. या संघात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचाही संघात समावेश आहे. या संघाचे कर्णधारपद ध्रूव शोरे सांभाळेल.
पंतचा संघात समावेश असला तरी तो या स्पर्धेतील सुरुवातीच्या काही सामन्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. कारण त्याचा 2 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी भारताच्या संघात समावेश आहे. त्यामुळे तो नंतर ही कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघात सामील होईल.
त्याचबरोबर शिखर धवन त्याच्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याने त्याचा दिल्ली संघात समावेश करण्यात आलेला नाही.
विजय हजारे ट्रॉफीसाठी असा आहे दिल्लीचा संघ –
ध्रुव शोरे (कर्णधार), नितीश राणा, रिषभ पंत, हिम्मत सिंग, हितेन दलाल, कुणाल चंडेला, ललित यादव, पवन नेगी, नवदीप सैनी, सुबोध भाटी, कुलवंत खेजरोलिया, मनन शर्मा, कुंवर भिदुरी, विकास टोकस, तेजस बरोका, अनुज रावत.
https://t.co/Btpyd2UW8b
@vishalmenon0 @aritram029 @Vimalsports @karishmasingh22 @cheerica @DMPant @circleofcricket @kannandelhi @chetan0711 @rawatrahul9— DDCA (@delhi_cricket) September 18, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–किंग कोहलीने केला खूलासा, या कारणामुळे होतात सातत्याने मोठ्या धावा
–पाकिस्तानचा हा माजी कर्णधार म्हणतो ‘विराट तू खरंच दिग्गज खेळाडू आहेस’
–रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला पण केला हा मोठा विक्रम