ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय ज्येष्ठ निवड समितीची सोमवारी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या तीन टी -२०, तीन वनडे आणि चार कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे.
या दौऱ्यात यष्टीरक्षक रिषभ पंतला टी-२० आणि वनडे संघातून डच्चू मिळाला असून दोन खेळाडूंना यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली आहे.
#TeamIndia ODI squad: Virat Kohli (Capt), Shikhar Dhawan, Shubman Gill, KL Rahul (vc & wk), Shreyas Iyer, Manish Pandey, Hardik Pandya, Mayank Agarwal, Ravindra Jadeja, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Navdeep Saini, Shardul Thakur #AUSvIND
— BCCI (@BCCI) October 26, 2020
टी-२० संघात पंतच्या जागी यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन आणि केएल राहुल या दोन यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली आहे. त्याचसोबतच वनडे संघात यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलला संधी देण्यात आली आहे.
“२०२१ विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचा मर्यादीत षटकांचा विकेटकीपर म्हणून राहुलला पहिली पसंती असणार आहे.त्याने त्याच्या नेतृत्त्वगुणानेही सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याचमुळे त्याला संघाचा उपकर्णधार केले आहे, ” असे बीसीसीआय सुत्रांनी सांगितले.
#TeamIndia ODI squad: Virat Kohli (Capt), Shikhar Dhawan, Shubman Gill, KL Rahul (vc & wk), Shreyas Iyer, Manish Pandey, Hardik Pandya, Mayank Agarwal, Ravindra Jadeja, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Navdeep Saini, Shardul Thakur #AUSvIND
— BCCI (@BCCI) October 26, 2020
टी-२० आणि वनडे संघात पंतला संधी मिळाली नसली, तरी कसोटी संघात मात्र त्याला संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असे असतील संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद. सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
-पुजारा, विहारी आणि शास्त्री लवकरच होणार युएईला रवाना, ‘हे’ आहे कारण
-अखेर सूर्यकुमार यादवची प्रतिक्षा संपली, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व?
-स्पर्धेतून बाहेर गेलेली चेन्नई ठरणार ‘या’ संघांसाठी डोकेदुखी; बिघडवणार प्लेऑफची गणितं?
ट्रेंडिंग लेख-
-IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
-अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती