---Advertisement---

भारतीय क्रिकेट इतिहासात कोणत्याही यष्टीरक्षकाला जमले नव्हते ते रिषभ पंतने अवघ्या २३ व्या वर्षी करुन दाखवले

On: बुधवार, मे 5, 2021 3:54 PM
---Advertisement---

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे संघात कसोटी मालिकेतील पहिला तर बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना नुकताच ३ मे रोजी पार पडला. या सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (५ मे) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ही क्रमवारी जाहीर झाल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे.

या क्रमवारीत रिषभ पंत फलंदाजांच्या यादीत ७४७ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की यष्टीरक्षक फलंदाजाने कसोटी क्रमवारीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला असा कारनामा करता आला नव्हता. विशेष म्हणजे रिषभने केवळ वयाच्या २३ व्या वर्षी हा कारनामा केला आहे.

यापूर्वी फारुख इंजिनियर यांनी प्रामुख्याने यष्टीरक्षक असताना कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत १७ वे स्थान मिळवले होते. हे भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने मिळवलेले सर्वोत्तम स्थान होते. त्यांची जानेवारी २०१९ मध्ये रिषभने बरोबरी केली होती. त्यानंतर रिषभने मागे वळून न पाहाता पुढे चांगली प्रगती करत आता पहिल्या १० फलंदाजांमध्येही स्थान मिळवले आहे. त्यांच्यानंतर एमएस धोनीचा क्रमांक लागतो. धोनीचे कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत १९ वे सर्वोत्तम स्थान राहिले आहे.

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत रिषभसह फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर संयुक्तरित्या भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्स देखील आहे. त्यांचेही प्रत्येकी ७४७ गुण आहेत.

त्याचबरोबर या क्रमवारीत पहिल्या १० फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीही आहे. तो ५ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सध्या विराट, रिषभ आणि रोहित हे तीन भारतीय क्रिकेटपटू फलंदाजांच्या यादीत पहिल्या १० क्रमांकांमध्ये आहेत. या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर सध्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर स्टिव्ह स्मिथ, तिसऱ्या क्रमांकावर मार्नस लॅब्यूशेन आणि चौथ्या क्रमांकावर जो रुट आहे.

रिषभ आहे चांगल्या फॉर्ममध्ये 

रिषभने २०२०-२१ ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकांमध्येही दमदार प्रदर्शन केले.

रिषभने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ कसोटी सामन्यात खेळताना ६८.५० च्या सरासरीने २७४ धावा केल्या होत्या. यात त्याने सिडनी कसोटीत केलेल्या ९७ धावांच्या आणि ब्रिस्बेन येथे द गॅबा स्टेडियमवर केलल्या नाबाद ८९ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्याच्या या दोन खेळी भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात मोलाच्या ठरल्या होत्या. तसेच तो या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही ठरला.

त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात ४ कसोटी सामन्यात खेळताना रिषभने ५४ च्या सरासरीने २७० धावा केल्या होत्या. तो या मालिकेत जो रुट आणि रोहित शर्मानंतरचा सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताच्या ‘या’ फलंदाजाची पत्नी आहे वकील, सात वर्षे डेट केल्यावर इंग्लंडमधील प्रसिद्ध ठिकाणी केलं होतं प्रपोज

सिक्सर किंग! आयपीएल २०२१मध्ये खणखणीत षटकारांचा पाऊस पाडणारे शिलेदार, अव्वलस्थानी आहे ‘हा’ भारतीय

आयपीएल संपताच आरसीबीच्या संघनायकाने गाठलं घर, आता पत्नीसह करणार देशाची मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---