---Advertisement---

सिक्सर किंग! आयपीएल २०२१मध्ये खणखणीत षटकारांचा पाऊस पाडणारे शिलेदार, अव्वलस्थानी आहे ‘हा’ भारतीय

On: बुधवार, मे 5, 2021 2:58 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी होणार होता. परंतु ३ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ४ मेला सनराझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहादेखील कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएलच्या कमिटीने तातडीने बैठक घेऊन आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत आतापर्यंत २९ सामने खेळले गेले. या सामन्यांमध्ये देखील चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला होता. चला तर पाहूया आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वाधिक षटकार लागणारे फलंदाज.

१) केएल राहुल : पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुल याने या हंगामात तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात तब्बल ३३१ धावा केल्या आहेत. यात त्याने सर्वाधिक १६ षटकार लगावले.

२) जॉनी बेअरस्टो : सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीचा फलंदाज जॉनी बेअरस्टो याने आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील आक्रमक फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. या हंगामात देखील त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. त्याने या हंगामात ७ सामने खेळले आहेत. यात त्याने २४८ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १५ षटकार देखील लगावले.

३) अंबाती रायुडू : चेन्नई सुपर किंग्ज संघाचा मध्यक्रमातील फलंदाज, अंबाती रायुडू देखील या हंगामात चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात नाबाद ७२ धावांची खेळी केली होती. यात त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. तसेच त्याने ७ सामन्यात १३ षटकार लगावले.

४) जोस बटलर : राजस्थान रॉयल्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. तसेच त्याने या हंगामातील ७ सामन्यात एकूण १३ षटकार लगावले.

५) आंद्रे रसल : कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसल हा देखील मोठ मोठे षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. त्याने या हंगामात ७ सामने होते. यात १५५ च्या स्ट्राइक रेटने १६३ धावा केल्या होत्या. यात त्याला १३ षटकार लगवण्यात यश आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१: कोरोनावर मात आणि मैदानावर दमदार प्रदर्शनाची छाप, ‘या’ ४ धुरंधरांची बातच न्यारी

एकीकडे कोरोनाने घेरले, दुसरीकडे फ्रँचायझीने पूर्णवेळ बाकावर बसवले; ‘या’ खेळाडूसाठी आयपीएल २०२१ दुर्दैवी ठरले!

आयपीएल २०२१ मधील अनोखे पण शानदार विक्रम, जे तुम्हाला फारसे माहितही नसतील; वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---