पंजाब किंग्ज संघाचा सलामीचा फलंदाज मयंक अगरवाल हा आयपीएल २०२१ स्पर्धेत चांगल्याच फॉर्ममध्ये होता. शेवटच्या सामन्यात, केएल राहुलच्या अनुपस्थितीत त्याने पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व केले होते. हा सामना पंजाब किंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु या सामन्यात मयंकने ९९ धावांची खेळी केली होती. त्याला भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. या संकटकाळी त्याच्या पत्नीने त्याला खूप साथ दिली होती.
मयंकने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघात पदार्पण केले होते. पदार्पण करण्यापुर्वी त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. ते म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. असेच काहीतरी मयंकच्या बाबतीतही घडले होते. त्याची पत्नी आशिता सूद हीने त्याला खूप साथ दिली होती. या दोघांची भेट दिवाळीत एका पार्टीमध्ये झाली होती. इथे त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर पुढे त्यांच एकमेकांना भेटणं सुरू झालं होतं.
https://www.instagram.com/p/Bhd5P4nF2O7/?igshid=r298qdjn6bwl
अशी घातली होती विवाहासाठी मागणी
मयंक अगरवालने आशिता सूदला ७ वर्षे डेट केल्यानंतर विवाहाची मागणी केली होती. त्याने एकदम फिल्मी स्टाइलमध्ये इंग्लंडची राजधानी लंडनमधील प्रसिद्ध ठिकाण लंडन आयमध्ये विवाहासाठी मागणी घातली होती.
https://www.instagram.com/p/Br_lp3Ul-5v/?igshid=lurrpqla1tr6
https://www.instagram.com/p/B8iTsoUpUQd/?igshid=1m1kqde116fa5
सात वर्ष डेट केल्यानंतर या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. जानेवारी २०१८ मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. तर याचवर्षी जून महिन्यात ते विवाह बंधनात अडकले होते. विवाह झाल्यानंतर डिसेंबर २०१८ मध्येच त्याला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती.
https://www.instagram.com/p/Bjq7NZQAVfE/?igshid=qutd8rkx1qz5
https://www.instagram.com/p/B2ySkH2l2e_/?igshid=1lwfshthrjmnk
https://www.instagram.com/p/BxWa9qhHFfG/?igshid=b9lty3ikcn8w
https://www.instagram.com/p/BflNCE7hS2V/?igshid=vzxijd6h41gj
त्याची पत्नी आशिता एक वकील आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असते. तिने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये देखील लिहिले आहे की, ती वकील आहे. तिला फिरायला आवडतं. हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटोज् आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या-
सिक्सर किंग! आयपीएल २०२१मध्ये खणखणीत षटकारांचा पाऊस पाडणारे शिलेदार, अव्वलस्थानी आहे ‘हा’ भारतीय
मुंबईकर आहेत शेवटी, सगळ्या गोष्टी हटकेच करणार! आयपीएल २०२१चा मुंबई इंडियन्सने ‘असा’ घेतला निरोप
आयपीएल संपताच आरसीबीच्या संघनायकाने गाठलं घर, आता पत्नीसह करणार देशाची मदत






