---Advertisement---

सर्वकालीन महान सलामीवीराने रिषभला दिली ‘स्टँडिंग ओव्हेशन’; शतकी खेळीबाबत म्हणाला…

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 5:44 PM
capetown rishabh 100
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका व भारत यांच्यात कसोटी मालिकेतील (sa vs ind test series) तिसरा सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिका संघाने हा सामना जिंकत मालिका आपल्या नावे केली. तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) याने अप्रतिम फलंदाजी करत स्वतःचे शतक पूर्ण केले. या शतकी खेळीनंतर भारतीय संघाकडून त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले गेले. तसेच माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavasakar) यांनीही त्याचे कौतुक केले.

तिसऱ्या दिवशी पंतने मार्को जेन्सनचा एक शॉर्ट चेंडू ऑन साइडच्या दिशेने मारला आणि एक धाव घेतली. ही एक धाव घेताच त्याने शतकही पूर्ण झाले. शतक पूर्ण केल्यानंतर पंतने डोक्यातील हेल्मेट काढले आणि दोन्ही हात वर करून ड्रेसिंग रूमकडे पाहू लागला. यावेळी पंत उत्साहात दिसत होता. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय संघ उभा राहून टाळ्या वाजवत होता. भारतीय संघासाठी पंतचे शतक खूप महत्वाच्या वेळी आले होते आणि संघातील सर्व खेळाडूंना त्याचे मोल माहिती होते.

सामन्यादरम्यान भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार सुनील गावसकर टीव्हीवर समासोचन करत होते. यावेळी गावसकरांनी देखील पंतचे या शतकी खेळीसाठी तोंड भरून कौतुक केले. मार्को जेन्सनच्या चेंडूवर भारतीय संघाने जसप्रीत बुमराहच्या रूपात शेवटीच विकेट गमावली. पंत शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि जेव्हा मैदानाबाहेर जात होता, तेव्हा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील त्याच्यासाठी बाहेर येऊन टाळ्या वाजवत होते. समालोचन करताना सुनील गावसकर म्हणाले की, “मी देखील उभा राहून एका सर्वश्रेष्ठ खेळीसाठी टाळ्या वाजवत आहे.”

दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या डावात पतंने १३९ चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये १०० धावा ठोकल्या. पंतव्यतिरिक्त विराट कोहली दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने दुसऱ्या डावात २९ धावांचे योगदान दिले. पंतच्या शतकाच्या मदतीने भारताची धावसंख्या दुसऱ्या डावात कशीबशी १९८ धावांपर्यंत पोहोचली. माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने देखील पंतचे या शतकासाठी कौतुक केले. तो म्हणाला की, ही खेळी फक्त सामना नव्हेतर, मालिका जिंकवून देणारी असेल.

तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने २२३ धावा केल्या होत्या आणि नंतर फलंदाजीला आलेला दक्षिण अफ्रिका संघ २१० धावांवर गुडाळला गेला होता. पहिल्या डावात भारताने १३ धावांची माफक आघाडी घेतली होती. शेवटच्या डावात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाने तीन गडी गमावत पूर्ण करून मालिका खिशात घातली.

महत्वाच्या बातम्या –

“तेरा वर्षांपासून बडबड सुरु आहे, तू मला शांत ठेवशील का?” विराट-एल्गर यांच्यात रंगला शाब्दिक वाद

“रिमेंबर द नेम, रिषभ पंत”, शतकी खेळीनंतर चाहते भलतेच खुश, दिल्या अशा प्रतिक्रीया

आयपीएलमध्ये नाही दिसणार इंग्लिश खेळाडू?

व्हिडिओ पाहा – 

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---