श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेसाठी (IND vs SL) शनिवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माला (rohit sharma) कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेचा भाग असणार नाही. बीसीसीआयने त्याला विश्रांती दिली आहे. एवढेच नाही तर रविवारी (२० फेब्रुवारी) पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यातही पंत सहभागी नसेल.
रिषभ पंत हा क्रिकेटसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असतो. पंत काही वर्षांपासून ईशा नेगीला डेट करत आहे. तिचा रविवारी(२० फेब्रुवारी) वाढदिवस होता. यावेळी ईशा नेगीचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना पंतने हार्टचा इमोजी टाकला आहे आणि ‘हॅपी बर्थडे ईशा नेगी’ असं लिहले आहे. याला उत्तर म्हणून ईशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पंतच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आणि आय लव्ह यू असे लिहिले आहे.
२०२० च्या सुरुवातीला रिषभ पंतने सोशल मीडियावर ईशा नेगीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्यादरम्यान दोघेही सुट्टीवर गेले होते. त्यानंतर पंतने उघडपणे संपूर्ण जगासमोर आपले प्रेम व्यक्त केले. ईशा नेगी मूळची उत्तराखंडच्या डेहराडूनची असून ती इंटेरियर डिझायनर आहे. ईशा नेगी तिच्या ग्लॅमरस लूकसाठी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
ईशा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा स्टायलिश फोटो शेअर करत असते. ज्यामध्ये ती पारंपारिक ते वेस्टर्न स्टाइलच्या पोशाखात दिसते. तिचे शिक्षण दिल्ली आणि नोएडा येथे पूर्ण केले आणि त्यानंतर ईशा सध्या नवी मुंबईत राहते आणि तिथूनच तिचा व्यवसाय सांभाळते. इंस्टाग्रामवर तिचे १ लाख ७३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
रिषभ पंतने मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी केली आणि भारतीय संघाच्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर पंतने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आपली खेळी कायम ठेवली. त्याच्या महत्वपूर्ण कामगिरीमुळे पंत भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
आयपीएल २०२१ मध्ये रिषभ पंतने आपल्या कर्णधारपदाने सर्वांना प्रभावित केले होते. पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स सघ अव्वल स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. परंतु अंतिम समाना गाठू शकला नाही. २०२१ मध्ये आयपीएलच्या १४ व्या हंगामात पंतने १६ सामन्यात ३४.९१ च्या सरासरीने ४१९ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने तीन अर्धशतके झळकवली. रिषभ पंत आयपीएल २०२२ मध्ये दिल्लीचे कर्णधारपदही सांभाळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बिहार में बिल्कुल बहार नहीं! माजी भारतीय यष्टीरक्षकाची बिहार क्रिकेट बोर्डावर खरपूस टीका
पुजाराची धुव्वादार खेळी आणि १०व्या विकेटसाठीची अभेद्य भागीदारी, सौराष्ट्रने मुंबईविरुद्ध टाळला पराभव
श्रीलंकेने राखली इभ्रत! अखेरच्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर केली मात