दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कसोटी मालिकेत २-१ ने विजयी झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकाने वनडे मालिकेत देखील २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात देखील भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बाद करण्यात अपयशी ठरले होते. दरम्यान सामना झाल्यानंतर रिषभ पंतने (Rishabh pant) भुवनेश्वर कुमारच्या(Bhuvneshwar Kumar) फॉर्मबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी २८८ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात देखील भारतीय संघातील मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमारला एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात ८ षटक गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने ६७ धावा खर्च केल्या.
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले |
सामना झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या फॉर्मबद्दल बोलताना रिषभ पंत म्हणाला की, “भुवनेश्वर कुमारचा फॉर्म हा आमच्यासाठी चिंतेचा विषय नाहीये. एक संघ म्हणून आम्ही सतत सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहोत. मला नाही वाटत की, त्याचा फॉर्म आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आम्ही बर्याच दिवसांनी वनडे खेळत आहोत. साहजिकच मालिका गमावणे निराशाजनक आहे. पण आम्ही आमच्या चुकांमधून शिकत आहोत.”
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रिषभ पंतने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली होती. या तर कर्णधार केएल राहुलने ५५ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ५० षटक अखेर ६ बाद २८७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाकडून जानेमन मलानने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने ७८ धावांचे योगदान दिले. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या :
राज बावाने तोडला धवनचा १८ वर्ष जुना विश्वविक्रम! युवराजशी आहे खास नाते
प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा असणार खास आकर्षण; हरियाणा सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय
हे नक्की पाहा: