गेल्या ३ दिवसांपासून चेन्नईत चालू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात चमकदार कामगिरी करत भारताने तब्बल ३१७ धावांच्या फरकाने इंग्लंडवर मात केली. या सामन्याच्या चौथ्या दिवशी (१६ पेब्रुवारी) इंग्लंडपुढे ४२९ धावांचे भलेमोठे लक्ष्य होते. अशात दिवसाच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी पटापट इंग्लंडच्या फलंदाजांना बाद केले. त्यातही मोईन अलीच्या विकेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
झाले असे की, इंग्लंडची वरची आणि मधळी फळी बाद झाल्यानंतर अष्टपैलू मोईन आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. संघापुढे ३०० हून अधिक धावांचे आव्हान लक्ष्य असल्याने त्याने आक्रमकपणे फलंदाजी करत अधिकाधिक धावा जोडण्याचा प्रयत्न केला. २३८.८९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने अवघ्या १८ चेंडूत ४३ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ५ खणखणीत षटकार आणि ३ चौकार मारले.
मोईनच्या विस्फोटक फलंदाजीला पाहता लवकरात लवकर त्याची विकेट काढणे भारतीय संघासाठी महत्त्वाचे होते. त्या अनुशंगाने भारताचा कर्णधार विराट कोहलीने फिरकीपटू कुलदीप यादवकडे डावातील ५५ वे षटक सोपवले. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोईनने क्रिजच्या पुढे जात मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून मागे पंतच्या हातात गेला. पंतनेही क्षणाचाही विलंब न करता चेंडू यष्टीला लावला आणि संघाला दहावी विकेट मिळाली.
Spider man spider man pant is a spider man #INDvsENG #RishabhPant #kuldeep pic.twitter.com/cfzPjc7CYu
— Shashank Suresh ???? (@ShashankSures14) February 16, 2021
https://twitter.com/Swarnjeet_6402/status/1361572951858966535?s=20
कौतकास्पद बाब अशी की, पंतने मोईनपुर्वी दुसऱ्या डावात डॅनियल लॉरेन्सलाही अशाच पद्धतीने बाद केले होते. आर अश्विनच्या चेंडूवर अवघ्या २६ धावांवर पंतने त्याची दांडी गुल केली होती. एवढेच नव्हे तर, इंग्लंडच्या पहिल्या डावातही पंतने यष्टीमागे २ झेल पकडले होते. यात ऑली पोप आणि जॅक लीचचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
टेस्ट चॅम्पियनशिप: विजयानंतरही फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भारताला टेंशन; अशी आहेत समीकरणे
अश्विन स्टोक्सच्या क्रिकेट कुंडलीचा शनी! एक-दोन नव्हे तब्बल ‘इतक्यांदा’ धाडलंय तंबूत






