आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ 1 महिन्याचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक संघाच्या सोशल मीडियावर विविध पोस्ट पहायला मिळत आहे. त्याप्रमाणेच यावर्षी दिल्ली कॅपिटल्स या नवीन नावाने खेळणार असलेल्या दिल्लीच्या सोशल मीडिया हँडेलवर एक छोटो व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
या व्हिडिओतून दिल्ली कॅपिटल्सची नवीन जर्सीदेखील प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला आव्हान देतानाही दिसला आहे.
या व्हिडिओमध्ये सुरुवातीला पंत धोनीबद्दलची वर्तमान पत्रातील कात्रणे चिकटवलेली एक वही घेऊन धोनीचे कौतुक करताना दिसत आहे.
तसेच तो यात म्हणतो ‘माही भाई गुरुच्या समान आहेत. जर माही भाई नसता तर माहित नाही मी यष्टीरक्षक फलंदाज बनलो असतो की नाही, नसतो झालो. पण यावेळी मी त्याच्या संघाविरुद्ध तुफानी खेळ करणार आहे. ज्यामुळे कॅप्टन कूल, कूल राहणार नाही. त्यामुळे माही भाई तयार रहा मी माझा खेळ दाखवण्यासाठी येत आहे.’
त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी धोनीचीही हा व्हिडिओ पाहतानाची एक झलक दाखवण्यात आली आहे.
हाच व्हिडिओ रिषभ पंतनेही ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच त्याने ट्विट केले आहे की ‘माही भाई, सर्वकाही तूझ्याकडूनच शिकलो आहे तर तूझ्यासमोर खेळ दाखवला पाहिजे ना.’
Mahi Bhai, Sab aap se seekha hai, toh aap ke saamne game toh dikhana banta hai! 😉#VIVOIPL mein milengey – Kya kehte ho, @msdhoni @StarSportsIndia @IPL pic.twitter.com/eoJXJmhbDX
— Rishabh Pant (@RishabhPant17) February 23, 2019
पंत आणि धोनीसाठी 2018 चा आयपीएल मोसम चांगला गेला होता. पंतने 2018 च्या आयपीएलमध्ये 684 धावा केल्या होत्या. तसेच तो 2018 च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्याने 5 अर्धशतकेही केली होती आणि सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध 128 धावांची शतकी खेळी केली होती.
त्याचबरोबर धोनीने 2018 च्या आयपीएलमध्ये 3 अर्धशतकांसह 455 धावा केल्या होत्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपदही मिळवले होते.
यावर्षीच्या आयपीएलची सुरुवात 23 मार्चपासून होत असून पहिल्या दोन आठवड्यातील 17 सामन्यांचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. तर दिल्लीचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध 24 मार्चला होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात!
–असा पराक्रम करणारा जसप्रीत बुमराह बनणार दुसराच भारतीय गोलंदाज!
–किंग कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध घडवणार इतिहास!