---Advertisement---

रिषभ पंतने ‘या’ दिग्गजाचा ऑटोग्राफ घेतलेला फोटो केला शेअर, सोबत लिहिला भावनिक मेसेज

On: रविवार, ऑगस्ट 9, 2020 5:55 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने माजी दिग्गज खेळाडूसोबतचा एक जुना फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो इतर कोणाचा नसून भारतीय संघाचा माजी दिग्गज गोलंदाज आशिष नेहरासोबतचा आहे. पंतने हा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत पंतने एक भावनिक मेसेजही लिहिला आहे. त्याने लिहिले की, “आठवणी आपल्याला आठवण करून देतात. स्वप्न आपल्याला पुढे घेऊन जातात.”

भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात अंतिम ११ मधील स्थान गमावले

पंतने मर्यादित षटकांच्या भारतीय संघातील अंतिम ११मधील स्थान गमावले आहे. विश्वचषकानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला आपले स्थान पक्के करण्यासाठी बऱ्याच संधी दिल्या होत्या. परंतु तो पूर्णपणे अयशस्वी ठरला होता. आता एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघ व्यवस्थापनाने केएल राहुलला अंतिम ११ मध्ये सामील करत आहे. राहुल उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि तो मधल्या फळीत फलंदाजी करत यशस्वी ठरत आहे. त्यामुळे पंत समोरिल चिंता वाढल्या आहेत.

असे असले तरी रिषभ पंतचा आयपीएल विक्रम शानदार आहे. तो जर येत्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी करु शकला तर पुन्हा एकदा भारताच्या मर्यादीत षटकातील आपले स्थान पुन्हा मिळवू शकतो.

पंतने आयपीएलमध्ये एकूण ५४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३६.१६ च्या सरासरीने १७३६ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.

पंतचा आयपीएल विक्रम चांगला असून तो आयपीएलच्या १३ व्या हंगामातही आपला फॉर्म कायम ठेवतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-या दिग्गजाचा गजब खुलासा, ‘दुखापतीमुळे केला होता ३८० धावांचा विश्वविक्रम’

-संघसहकाऱ्याच्या ‘त्या’ कृत्यामुळे संपले ‘या’ दिग्गज खेळाडूचे करिअर; कसोटीच्या एका डावात घेतल्या होत्या ९ विकेट्स

-बापरे! आयसीसीच्या फेसबुक पेजने रचला इतिहास, व्हिडिओ चॅनेलला तब्बल १.६५ अब्ज वेळा पाहण्यात आले

ट्रेंडिंग लेख-

-वाढदिवस विशेष: वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा हॅमिल्टन मासाकात्झा

-हे ५ दिग्गज कदाचित कधीच नाही खेळू शकणार आयपीएल

-क्रिकेट जगतातील हे दिग्गज ५ खेळाडू, ज्यांना हासताना चाहत्यांनी फारच क्वचित पाहिले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---