---Advertisement---

दिवस-रात्र कसोटीआधी रिषभ पंतची मस्ती, विराट कोहलीलाही घाबरवले; पाहा व्हिडिओ

On: बुधवार, फेब्रुवारी 24, 2021 9:56 AM
---Advertisement---

अहमदाबाद। बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) इंग्लंड विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (मोटेरा स्टेडियम) येथे होणार असून हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्याआधी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत ड्रोन कॅमेरासह मस्ती करताना दिसला आहे.

जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास दोन्ही संघाचे खेळाडू सज्ज असून त्यांनी सामन्याआधी बरीच मेहनत घेतली आहे. दरम्यान, या सामन्याआधी सराव सुरु असताना रिषभने ड्रोन कॅमेराचे कंट्रोलर हाताळले. या घटनेचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ट्विटर हँडेलवर शेअर केला आहे.

बीसीसीआयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की ‘काही चांगले झेल घेतल्यानंतर, यष्टीचीत केल्यानंतर आणि काही मोठे षटकार मारल्यानंतर रिषभ पंत आता ड्रोन कॅमेरासोबत मस्ती करत आहे.’

भारतीय खेळाडूंची घेतली मजा, विराटलाही घाबरवले

बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की ड्रोन कॅमेराचा रिमोट रिषभच्या हातात आहे. तसेच तो ड्रोन कॅमेरा उडवत भारतीय खेळाडूंच्या सरावादरम्यानची दृश्ये टिपत आहे. यावेळी अजिंक्य रहाणे ड्रोन कॅमेराकडे पाहून हसत आहे. तसेच प्रशिक्षक रवि शास्त्री मार्गदर्शन करत आहेत. चेतेश्वर पुजारा ड्रोन कॅमेराला बॅटने मारण्याचा प्रयत्न करत आहे, तर आर अश्विन ड्रोन कॅमेराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, सराव करत असलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीला या गोष्टींची कल्पना नसल्याचे समजते, त्यामुळे अचानक त्याच्याजवळ ड्रोन कॅमेरा आलेला पाहून तो घाबरल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते.

याशिवाय रिषभने १ लाख १० हजार आसन क्षमता असलेल्या भव्य मोटेरा स्टेडियमचीही काही दृष्ये टिपली आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1364115849368363013

मी त्याला स्पायडी म्हणतो – रिषभ पंत 

रिषभने स्वत:च्या अधिकृत ट्विटर हँडेलवरही ड्रोन कॅमेरा हाताळण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडियोला कॅप्शन दिले आहे की ‘मी यष्टीमागे खूप वेळ घालवला. आता मी नेट्सचे वेगळे दृश्य टिपण्याचा विचार करत आहे. भेटा माझ्या नव्या मित्राला, मी त्याला स्पायडी म्हणतो.’

https://twitter.com/RishabhPant17/status/1363889535365435393

जबरदस्त फॉर्ममध्ये आहे रिषभ पंत 

रिषभ मागील काही सामन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या ४ कसोटी सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सिडनी कसोटीत ९७, ब्रिस्बेन कसोटीत नाबाद ८९ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत ९१ तर दुसऱ्या कसोटीत ५८ धावांची खेळी केली होती.

त्याच्या या फॉर्मचा फायदा त्याला झाला असून त्याची इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताच्या टी२० संघात निवड झाली आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर १२ मार्चपासून ५ सामन्यांची टी२० मालिका भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलचा आणखी एक मोठा विक्रम! या भारतीय क्रिकेटरला टाकले मागे

ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम!! याच मैदानात झालेत ‘हे’ खास विक्रम

सचिन, २०० धावांची खेळी आणि आम्ही…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---