भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कधी त्याच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे तर कधी खराब फॉर्ममुळे, कधी यष्टीमागील त्याच्या गमतीशीर बडबडीमुळे चर्चेत असतो. नुकताच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने अफलातून कामगिरी केली. यामुळे त्याची बरीच चर्चा ही क्रिकेटवर्तुळात झाली. पंत हा फलंदाज म्हणून जितका आक्रमक आहे, तसा तो मनाने थोडा भावनिक आहे. तो प्रत्येक मालिकेनंतर त्याची किटबॅग ज्यूनियर क्रिकेटपटूंना देतो.
याबाबत त्याने इंडिया टूडेच्या एका मुलाखतीत खुलासा केला. तो म्हणाला, तो बीसीसीआयचा वार्षिक करार मिळाल्यापासून असं करत आहे. त्याने किट बॅग ज्यूनियर क्रिकेटपटूंना देण्यामागील कारण सांगितले की त्याचे प्रशिक्षक तारक सिन्हा त्याला फलंदाजी आणि यष्टीरक्षणाबाबतची साधने पुरवत असतं. ते बॅट आणि शुज द्यायचे. आशिष नेहरापण क्लबमध्ये काही सामन देत असायचा. काही रणजी खेळणारे क्रिकेटपटूही असे करायचे. ज्याची त्याला मदत झाली. त्यामुळे त्याला वाटले की आपणही मदत करायली हवी.
पंत म्हणाला, आता तो या स्थितीत आहे की तो दुसऱ्यांना मदत करु शकतो. त्यामुळे तो मदत करत असतो.
पंतने नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली. तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता. त्याने 3 कसोटी सामन्यात 274 धावा केल्या. यात त्याच्या सिडनी कसोटीतील 97 धावांच्या आणि ब्रिस्बेन कसोटीतील नाबाद 89 धावांच्या खेळीचा समावेश आहे.
या कामगिरीनंतर पंतचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. मात्र, तो या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी खराब फॉर्मशी झगडत होता. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. याबाबत पंत म्हणाला, तो प्रत्येकदिवशी दबावात होता. हा खेळाचा एक भाग आहे. तसेच तो म्हणाला, एक व्यक्ती म्हणून स्वत:वर विश्वास असायला हवा. त्याच्या आसपास असे लोक होते, ज्यांनी त्याला स्वत:वर विश्वास ठेवण्यात आणि पुढे जाण्यास सांगितले. तसेच सोशल मीडियापासून तो दुर राहिला आणि केवळ क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन
अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर
ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० मालिकेसाठी केली १८ सदस्यीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी





