चेन्नई। शनिवारपासून(१३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर कसोटी मालिकेचा दुसरा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असून भारताने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या आहेत. दरम्यान, पहिल्याच दिवशी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेले दिसले.
पंत-स्टोक्समध्ये जुंपली
झाले असे की भारतीय संघाचा पहिला डाव सुरु असताना ८७ वे षटक इंग्लंडचा कर्णधार जो रुट टाकत होता. त्यावेळी हे षटक पहिल्या दिवसाचे शेवटचे षटक ठरावे म्हणून भारताकडून फलंदाजी करत असलेला रिषभ पंत खेळण्यासाठी उशीर करत होता. तो चेंडू पडल्यानंतर काही वेळ घेत होता. हे पाहून स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या बेन स्टोक्स त्याला काहीतरी म्हणाला, त्यावर पंतनेही त्याला उत्तर दिले.
दरम्यान, पंतने जोपर्यंत स्टंपमागून बडबड बंद होणार नाही, तोपर्यंत फलंदाजी न करण्याचाही पवित्रा घेतला. अखेर पंतने या षटकातील शेवटचे दोन चेंडू खेळले. पण बाचाबाची इथे थांबली नाही. यावेळी मैदानावरील पंच पंतशी बोलतानाही दिसले. तसेच पंचांनी आणखी एक षटक होऊ शकते, असा निर्णय घेतला.
याचवेळी ८८ वे षटक चालू होण्याआधी स्टोक्स आणि पंत यांच्यात पुन्हा काहीतरी शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसले. यावेळी त्यांच्यात पंचांनाही मध्यस्थी करावी लागली. तसेच रुटही समजावताना दिसला. अखेर ८८ वे षटक ऑली स्टोनने टाकले आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला. दिवसाच्या शेवटी पंत आणि स्टोक्समधील बाचाबाची नंतर चर्चेचा विषय ठरली. तसेच या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
https://twitter.com/yoyoyatharth/status/1360591272864456707
https://twitter.com/middlestump4/status/1360597854717419523
https://twitter.com/JitAnkit/status/1360566656985014275
या घटनेवर भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरनेही मजा घेतली. त्याने पंत स्टोक्स आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक बेन फोक्सकडे बघत उभा राहिलेला फोटो शेअर करत लिहिले की ‘जब तक ये खेल खतम नहीं होता, अपुन इदरिच हैं!’
"Jab tak ye khel khatam Nahi hota apun idharich hai!" #INDvsENG pic.twitter.com/OqIudUdlGR
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 13, 2021
पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व –
चेन्नई येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून पहिल्या दिवशी रोहित शर्माने १६१ धावांची दीडशतकी खेळी केली. तर अजिंक्य रहाणेने ६७ धावांची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी करत भारताला भक्कम स्थितीत उभे केले. त्याआधी रोहितने चेतेश्वर पुजाराबरोबरही ८५ धावांची भागीदारी केली. होती.
भारताने पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ३ विकेट्स झटपट गमावल्याने दिवसाखेर ६ बाद ३०० धावा केल्या. भारताकडून पंत ३३ तर अक्षर पटेल ५ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून पहिल्या दिवसाखेर जॅक लीच आणि मोईन अलीने प्रत्येकी २ विकेट आणि स्टोनने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘उपकर्णधार’ अजिंक्य रहाणेने सांगितले भारतीय फलंदाजांच्या यशाचे गमक, म्हणाला…
नयन मोंगिया आणि मनोज प्रभाकरची ‘ती’ कुविख्यात भागीदारी
श्रीलंकन क्रिकेटपटू कुशल मेंडिस अडकला विवाहबंधनात, संघ सहकाऱ्याने फोटो शेअर करत दिली माहिती