आयपीएल २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना रविवार (१० ऑक्टोबर) पासुन सुरुवात होणार आहे. क्वालिफायरच्या पहिल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. प्लेऑफ सामने खेळण्याचा दांडगा अनुभव असलेल्या एमएस धोनीसमोर पहिल्यांदाच रिषभ पंत कर्णधार म्हणून प्लेऑफच्या सामन्यात उतरणार आहे. यासह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली आणि आपल्या दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवले. आता चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिला क्वालिफायर सामना खेळत रिषभ पंत प्लेऑफमध्ये संघाचे नेतृत्व करणारा सर्वात युवा खेळाडू होण्याचा विक्रम आपल्या नावावर करणार आहे. रिषभ पंतचे वय सध्या २४ वर्ष आणि ६ दिवस आहे. या बाबतीत तो आपल्याच संघातील श्रेयस अय्यरला मागे टाकणार आहे. २०१९ मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी श्रेयस अय्यर २६ वर्षांचा होता.
तसेच ४० वर्षीय एमएस धोनी प्लेऑफमध्ये संघाचे नेतृत्व करणारा दुसरा सर्वात वयोवृद्ध कर्णधार बनेल. याबाबतीत तर पहिल्या स्थानी राहुल द्रविड आहे. राहुल द्रविडने २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
आयपीएल स्पर्धेतील सर्वात युवा कर्णधार
याबरोबरच रिषभ पंत या हंगामात दिल्लीच्या नेतृत्त्वाची सूत्रे सांभाळत कोणत्या आयपीएल संघाचे नेतृत्व करणारा पाचवा युवा कर्णधार ठरला आहे. त्याला श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. तसेच आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने वय वर्ष २२ वर्ष ४ महिने आणि ६ दिवस असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व केले होते.
आयपीएल स्पर्धेतील सर्वात युवा कर्णधार
विराट कोहली – ( २२ वर्ष, ४ महिने आणि ६ दिवस)
स्टीव्ह स्मिथ – (२२ वर्ष, ११ महिने आणि ९ दिवस)
श्रेयस अय्यर -(२३ वर्ष, ३ महिने आणि २१ दिवस)
सुरेश रैना -(२३ वर्ष ,३ महिने आणि २२ दिवस)
रिषभ पंत -(२३ वर्ष, ६ महिने आणि ६ दिवस)
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत ‘या’ दोन खेळाडूंचे भवितव्य मेंटॉर धोनीच्या हातात; कोण आहेत ते धुरंधर?
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांचे खराब प्रदर्शन, ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्स राखून विजय