भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील पहिली कसोटी चेन्नई येथे खेळवली जात आहे. ज्याच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतने इतिहास रचला आहे. भारतीय संघाकडून तो संयुक्तपणे कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके करणारा पहिला क्रिकेटर बनला आहे. विशेष बाब म्हणजे त्याने माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनीची बरोबरी केली आहे. धोनीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 6 शतके आहेत. चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून पंतने आता कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 6 शतके ठोकली आहेत.
या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंत ब्रेक दरम्यान ड्रेसिंग रूममध्ये हात जोडून बॅट, हेल्मेट आणि ग्लोव्ह्जची पाडताना दिसत आहे. पंतचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
Rishabh Pant was worshiping his cricket bat before batting. ♥️ pic.twitter.com/m7KVdIj5cL
— Sports With Naveen (@sportscey) September 21, 2024
ऋषभ पंत ने टेस्ट क्रिकेट में अपना छठा शतक लगाया वह 632 दिन बाद टेस्ट मैच खेल रहे थे. भाई ने क्या शानदार वापसी किया
गेंद की रफ्तार और बल्ले का जोर,
क्रिकेट का खेल बनाता है, दिलों को और।#RishabhPant pic.twitter.com/LX059upfAd— Manjesh Jangir 🚩 हिन्दू (@monu_jangir3) September 21, 2024
पंतचा हा व्हिडिओ शेअर करताना एका चाहत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रिषभ पंतने कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक झळकावले. तो 632 दिवसांनी कसोटी सामना खेळत होता. काय मस्त कमबॅक केले आहे भावाने. चेंडूचा वेग आणि बॅटचे बळ, क्रिकेटचा खेळ मनाला भिडतो.
पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर तो संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. येथे 128 चेंडूंचा सामना करताना तो 85.16 च्या स्ट्राइक रेटने 109 धावा करण्यात यशस्वी झाला. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 13 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार आले.
हेही वाचा-
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
भारताचा दुसरा डाव घोषित, बांग्लादेश समोर 515 धावांचे तगडे लक्ष्य; गिल-पंतची शतकी खेळी!
शाकिब अल हसनचं नाव इतिहासात अजरामर! अशी कामगिरी करणारा बांगलादेशचा पहिलाच खेळाडू