भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने त्याच्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याला एमएस धोनीचा उत्तराधिकारी देखील म्हटले जाते. तो सध्या भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला आहे आणि तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. पंतच्या इथपर्यंतच्या प्रवासाचे सर्व श्रेय त्याने स्वतःचे वडील राजेंद्र पंत आणि प्रशिक्षक तारक सिन्हा यांना दिले आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या क्रिकेटमधील आतापर्यंतच्या प्रवासाविषयी बोलला आहे. त्याने त्याचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांचीही आठवण काढली. पंतचे वडील आणि प्रशिक्षक आज या जगात नाहीत आणि त्यांची आठवण पंतला नेहमीच येत असते. पंत म्हणाला की, त्याचे वडील आणि प्रशिक्षक गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कोणीच भरू शकत नाही. जेव्हा पंत २०२१ मध्ये भारतीय संघासोबत टी२०विश्वचषक खेळत होता, तेव्हा प्रशिक्षक ताकर सिन्हा आजारी पडले आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत पंत म्हणाला, “मला खरच माझ्या वडिलांची खूप आठवण येते. जेव्हा माझे वडील मला सोडून गेले, तेव्हा मी क्रिकेट खेळत होतो. तारक सर माझ्या दुसऱ्या वडिलांसारखेच होते. जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा मी खेळण्यात व्यस्त होते. मी आज जिथे आहे, फक्त या दोघांमुळेच आहे.”
“माझे वडील आणि तारक सर गेल्यानंतर आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कोणीच भरून काढू शकत नाही. होय, तुम्हाला आजू बाजूच्या लोकांसोबत राहावे लागेल. मी कधी-कधी माझ्या अडचणींवर आईसोबत बोलत असतो. देवेंद्र शर्मा (तारक सिन्हांचे विद्यार्धी आणि सॉनेट क्लबचे सहकारी) आहेत, खरेतर माझ्याकेड प्रत्यक्षात एक छोटे सर्कल आहे. सर्वांची आपापली जागा आहे. माझ्या आयुष्यात मित्र आणि कुटुंबासाठी वेगळे स्थान आहे.”
“मी त्यांना (तारक सिन्हा) त्याठिकाणाहून शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितले होते की, आयुष्यात काहीही होऊदे. तुला क्रिकेट खेळत राहायचे आहे. तू स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करणे गरजेचे आहे आणि मी तसा प्रयत्न केला आहे.” असेही पंत पुढे म्हणाला. दरम्यान, आयपीएल २०२२ हंगाम २६ मार्चपासून सुरू होत आहे आणि रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
गेल्या ४ वर्षांपासून आयपीएलमध्ये ‘या’ कारणामुळे होत नाहीये ओपनिंग सेरेमनी, वाचा सविस्तर
‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video