आयपीएल २०२१ मध्ये मंगळवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ६ गडी राखून विजय साजरा केला. मुंबईचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासोबत मजामस्ती केली.
रिषभने घेतली मजा
आयपीएल २०२१ मधील तेराव्या सामन्यात मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आले. या सामन्याच्या नाणेफेकी दरम्यान उभय संघांचे कर्णधार अत्यंत उत्साही वातावरणात एकमेकांशी मजामस्ती करताना दिसले. या हंगामात प्रथमच दिल्लीचे नेतृत्व करणारा युवा रिषभ पंत हा मुंबईचा कंदा रोहित शर्माला सतावत होता. नाणेफेकीवेळी त्याने रोहित शर्माला गुदगुल्या केल्या. त्यावर रोहित खळखळून हसताना दिसला. ही नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
मस्तीखोर स्वभावाचा आहे रिषभ
रिषभ पंत हा आपल्या मस्तीखोर व हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहे. सामन्यादरम्यान तो विरोधी संघातील फलंदाजांना यष्टीरक्षण करत असताना सतावताना दिसतो. २०१८-२०१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याच्याशी त्याने खूप मस्ती केली होती. मागील महिन्यात संपन्न झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो आपल्या संघसहकाऱ्यांना वेगवेगळ्या नावाने हाका मारत होता.
Rohit Sharma calls it right at the toss and elects to bat first against the #DelhiCapitals in Chennai.
Follow the game here – https://t.co/XxDr4f4nPU #VIVOIPL #DCvMI pic.twitter.com/TMuusCUC1G
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2021
दिल्लीचा स्पर्धेतील तिसरा विजय
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या ४४ व ईशान किशन आणि जयंत यादव यांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर १३७ धावा धावफलकावर लावल्या होत्या. अनुभवी अमित मिश्राने दिल्लीसाठी सर्वाधिक चार बळी मिळविले.
प्रत्युत्तरात, दिल्लीची सुरुवात खराब झाली व सलामीवीर पृथ्वी शॉ झटपट माघारी परतला. परंतु शिखर धवन व स्टीव स्मिथ या अनुभवी जोडीने ५३ धावांची भागीदारी करत दिल्लीला सामन्यात जिवंत ठेवले. मुंबईच्या गोलंदाजांना सलगपणे काही बळी मिळवत सामन्यात रंगत आणली. मात्र अखेरीस शिमरन हेटमायर व ललित यादवने धीराने फलंदाजी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
हा तर विराटच्याही पुढचा निघाला! रिषभ पंतच्या ‘त्या’ कृत्यावर चाहत्यांच्या उमटल्या भन्नाट प्रतिक्रीया
दिल्ली-मुंबई लढतीत रोहित शर्माला दुखापत, पुढील सामना खेळणार की नाही? पाहा काय म्हणाला
पुन्हा रंगली ‘मांकडिंग’ची चर्चा, लाईव्ह सामन्यात पोलार्डने धवनला दिली चेतावणी; व्हिडिओ व्हायरल