भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने शानदार अर्धशतक झळकावले आहे. सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झूकलेला असूनही पंतने आक्रमकता दाखवत मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी केली. पंतने आपल्या अर्धशतकीय खेळी दरम्यानच एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
पंत ऑस्ट्रेलियामध्ये 500 धावा करणारा पहिलाच आशियाई यष्टीरक्षक खेळाडू ठरलेला आहे. पंतने आपल्या 97 धावांच्या खेळी मध्ये ही मोठी उपलब्धी मिळवली आहे. विशेष म्हणजे पंतने ऑस्ट्रेलिया मध्ये 508 धावा केवळ आपल्या दहाव्या इनिंगमध्ये केलेल्या आहेत. पंत ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टिरक्षकांच्या यादीत क्रमांक 3 वर आहे. यष्टीरक्षका द्वारे ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा एलन नॉट यांनी केलेल्या आहे. नॉट यांनी 22 डावांत 643 धावा केलेल्या आहेत. यानंतर क्रमांक येतो तो पॉल दुजोन यांचा. दुजोन यांनी 18 डावात 587 धावा केलेल्या आहेत.
तसेच रिषभ पंत केवळ दुसराच भारतीय यष्टीरक्षक खेळाडू आहे ज्याने एखाद्या देशात 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पंत पूर्वी फारुख इंजिनियर यांनी वेस्टइंडीज मध्ये 500 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.
दरम्यान सामन्याचा विचार केला असता 407 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने आपल्या खेळाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. भारतीय संघाने संपूर्ण चार सत्रे खेळून काढत सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवले आहे. सामना संपला तेव्हा भारताने १३१ षटकात ५ बाद ३३४ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या:
सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी पंतची धमाकेदार फलंदाजी, आजी-माजी क्रिकेटर्सनी थोपटली पाठ
टीम इंडियाची ताकद जगासमोर! सिडनीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताने रचला हा मोठा विक्रम
सिडनी कसोटीतील जबरदस्त कामगिरीनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाचे वातावरण, पाहा व्हिडिओ