भारतीय क्रिकेटमध्ये सध्या अनेक खेळाडूंच्या निवृत्तीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. ज्याची सुरुवात रविचंद्रन अश्विनपासून झाली. आता गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियापासून दूर असलेल्या ऋषी धवननेही मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऋषीने 2016 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय त्याची गोलंदाजी आयपीएलमध्येही पाहायला मिळाली होती. ऋषीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आपल्या चाहत्यांना निवृत्तीची माहिती दिली.
ऋषी धवनने आपल्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, हा निर्णय घेताना मी खूप भावूक होत आहे, पण मी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. तथापि, मला याबद्दल खेद वाटत नाही कारण या खेळाने मला गेल्या 20 वर्षांत खूप काही दिले आहे, ज्यात खूप आनंद आणि अगणित महान आठवणी आहेत आणि हा खेळ नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ राहील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांनी मला दिलेल्या संधींबद्दल मी कृतज्ञ आहे. मोठ्या मंचावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे.
View this post on Instagram
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, ऋषी धवनला भारतीय संघाकडून वनडे आणि टी20 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने तीन वनडे आणि एक टी20 सामन्यात प्रत्येकी एक विकेट घेतली. आयपीएलमधील त्याच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर ऋषी धवनने 39 सामने खेळताना 35.64 च्या सरासरीने एकूण 25 विकेट घेतल्या, याशिवाय त्याने 210 धावाही काढल्या. तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ऋषी धवनने एकूण 134 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 29.74 च्या सरासरीने 186 विकेट्स 2906 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
रणजी ट्राॅफी न खेळण्यासाठी कारणे देवू नयेत, संघातील वरिष्ठ खेळाडूंना गावसकरांनी सुनावले
विराटसारख्या वरिष्ठ खेळाडूची जागा भारतीय संघात असावी का? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
सिडनी कसोटी ठरली ऐतिहासिक, या मैदानावर झाले 3 मोठे रेकाॅर्ड्स