---Advertisement---

जेव्हा रोहितने वाढवले रितीकाचे टेन्शन, बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

On: शनिवार, फेब्रुवारी 13, 2021 6:45 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला शनिवारपासून(१३ फेब्रुवारी) चेन्नईच्या मैदानावर सुरुवात झाली. पहिला सामना गमावलेल्या भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना मालिकेत पुनरागमन करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावत भारताला मजबूत सुरुवात करून दिली आहे. आक्रमक खेळी करणाऱ्या रोहितने शतक पूर्ण करण्यासाठी काही धावा शिल्लक असताना, अत्यंत संयमाने खेळत चाहत्यांचे व आपली पत्नी रितिकाचे टेन्शन चांगलेच वाढले होते.

रोहितने पूर्ण केले आपले सातवे कसोटी शतक

सध्या भारताचा सर्वात अनुभवी सलामीवीर असलेला रोहित शर्मा चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत सलामीसाठी मैदानात उतरला. पहिल्या षटकापासूनच त्याने इंग्लिश गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. रोहितने अवघ्या ४७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही, त्याने धावांचा वेग कायम राखला.

रोहितने ९७ धावांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त ११६ चेंडू घेतले. मात्र, त्यानंतर शतक पूर्ण करण्यासाठी त्याने १४ चेंडू खेळून काढले. शतक झळकावण्याचा दबाव त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. यादरम्यान त्याने काही चेंडू खेळून काढले तर काही चेंडू सोडून दिले. रोहित ९८ धावांवर असताना मोईन अलीच्या एका चेंडूवर त्याचा झेल उडाला होता. मात्र, तो चेंडू क्षेत्ररक्षक रॉरी बर्न्स याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. १३० व्या चेंडूवर पॅडल स्वीप मारत त्याने आपले सातवे कसोटी शतक पूर्ण केले.

बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

रोहित शर्माने ९७ ते १०० या तीन धावा काढण्यासाठी चौथा चेंडू खेळले. यादरम्यान ज्या-ज्यावेळी रोहित शर्मा विरोधी गोलंदाजांच्या गोलंदाजीवर चकला, त्यावेळी प्रेक्षकांत उपस्थित असलेली त्याची पत्नी रितीका ही चिंतित दिसली. त्या काही क्षणांचा एक व्हीडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केला. अखेरीस, रोहित शर्माने आपले शतक पूर्ण केल्यानंतर रितीकाने टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन केले.

रोहितचे विक्रमी शतक

काहीश्या खराब झालेल्या खेळपट्टीवर रोहित शर्माने जिद्दीने फलंदाजी करत २३१ चेंडूत १६१ धावांची लाजवाब खेळी केली. यादरम्यान त्याने १८ चौकार व २ उत्तुंग षटकार लगावले. रोहितचे हे चाळीसावे आंतरराष्ट्रीय शतक आहे. भारताकडून यापूर्वी सचिन तेंडुलकर (१००), विराट कोहली (७०) व राहुल द्रविड (४८) यांनी ४० पेक्षा जास्त शतके ठोकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

विराट खाते न खोलता बाद झाल्यावर झाल्यावर होतो भारताचा पराभव? पाहा काय सांगते आकडेवारी

स्पेशलं स्पेशलं…! ‘मी पुन्हा सांगतोय.. तो स्पेशलंच खेळाडू आहे’, ऐतिहासिक खेळीनंतर रोहितवर कौतुकाचा वर्षाव

Valentines Week Special : ५ वर्षे भारताच्या स्टार खेळाडूच्या अफेअरची कुणालाच नव्हती माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---