---Advertisement---

आता ‘या’ संघाकडून खेळणार चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड!

On: मंगळवार, जून 10, 2025 4:31 PM
---Advertisement---

भारतीय फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणार आहे. गायकवाड इंडिया ए सोबत इंग्लंड लायन्स विरुद्ध दोन अनऑफिशियल कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, पण त्याला तिथे एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता गायकवाडने यॉर्कशायर सोबत करार केला आहे. तो यॉर्कशायरसाठी संघासाठी पुढच्या महिन्यापासून खेळताना दिसेल.

गायकवाड पुढच्या महिन्यात सरे विरुद्ध सामन्यात यॉर्कशायर संघात सामील होईल. गायकवाड काउंटी चॅम्पियनशिप सामने खेळल्यानंतर वनडे कपमध्ये सुद्धा खेळताना दिसेल. ऋतुराजने किती वर्षासाठी हा करार केला आहे, हे अजून सिद्ध झाले नाही. पण तो घरेलू हंगामासाठी शेवटपर्यंत यॉर्कशायर संघासोबत खेळत राहील.

ऋतुराजने म्हटले, इंग्लिश डोमेस्टिक हंगामातील उर्वरित कालावधीसाठी यॉर्कशायरसोबत खेळण्यास मी उत्सुक आहे. या देशात क्रिकेटचा अनुभव घेणे हे माझे नेहमीच ध्येय राहिले आहे आणि इंग्लंडमध्ये यॉर्कशायरपेक्षा मोठा कोणताही क्लब नाही. आमच्याकडे काउंटी चॅम्पियनशिपमध्ये काही महत्त्वपूर्ण खेळ आहेत आणि वनडे कपमध्ये अवॉर्ड जिंकण्याची चांगली संधी आहे.

गायकवाड दोन महिन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे ऋतुराजला आयपीएल 2025 च्या एका सामन्यादरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. त्याने आयपीएल मधील फक्त पाच सामने खेळले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---