विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) 2022 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने सोमवारी (28 नोव्हेंबर) खेळले गेले. हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ग्राऊंड बी आणि ए वर खेळले गेले. ज्यामधील चार सामन्यांत जवळपास चार ते पाच खेळाडूंनी शतकी खेळी केल्या. यामध्ये महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश सामना ऋतुराज गायकवाड याने गाजवला. त्याने एका षटकात ऐतिहासिक सात षटकार मारत नाबाद द्विशतकी खेळी केली. दुसरीकडे रियान पराग यानेही दिडशतकी खेळी केली. विशेष म्हणजे ही खेळी त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केली.
या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) बरोबर जम्मू आणि काश्मीरकडून शुभम खजुरीया आणि हनन नाझिर यांनी, तर पंजाबच्या अभिषेक शर्मा यांनीही शतकी खेळी केल्या. अभिषेकने 109 धावा केल्या. तसेच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रियान पराग (Riyan Parag) याने जम्मू आणि काश्मीर विरुद्ध 174 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 10 षटके टाकताना एक विकेटही घेतली. हा सामना आसामने 7 विकेट्सने जिंकत उपांत्य फेरी गाठली.
𝘈𝘴𝘴𝘢𝘮 𝘩𝘢𝘪, 𝘢𝘢𝘴𝘢𝘢𝘯 𝘯𝘢𝘩𝘪. 👏👏 pic.twitter.com/dIbFwk7AOk
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) November 28, 2022
जम्मू आणि काश्मीर विरुद्ध आसाम यांच्यात विजय हजारे ट्रॉफीचा तिसरा उपांत्यपूर्व सामना खेळला गेला. ज्यामध्ये आसामने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. यावेळी जम्म्-काश्मीर संघाकडून सलामीवीर शुभम खजुरीया याने 84 चेंडूत 120 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 8 षटकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हनन नाझिर याने 113 चेंडूत 124 धावा केल्या. त्यांचा कर्णधार शुभम पुंडीर शून्यावर बाद झाला. त्यानंतर फझिल मुश्ताक याने 53 धावा केल्या. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 350 धावसंख्या उभारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना आसामच्या कुणाल साईकिया आणि राहुल हजारिका यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. त्यानंतर आलेल्या रियान पराग याने 116 चेंडूत 174 धावा केल्या. यामध्ये त्याने 12 चौकार आणि तेवढच षटकार खेचले. त्याच्यासाठी या स्पर्धेचा हंगाम उत्तम राहिला. त्याने तीन शतकी खेळी आणि एक अर्धशतक केले.
परागने या स्पर्धएत 117 (84), 14(19), 32(59), 128(93), 17(15), 55*(50), 0(1) आणि 174(116) धावा केल्या. त्याचबरोबर त्याने या स्पर्धेत 9 विकेट्सही घेतल्या आहेत. Riyan Parag century in Vijay Hazare Trophy Quarter Final vs Jammu & Kashmir & All-Rounder Performance
जम्मू-काश्मीर संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता आणि सामना हरल्याने त्यांचा स्वप्नभंग झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजू सॅमसनचे चाहते फिफामध्येही, राजस्थान रॉयल्सने केला ‘खास’ फोटो शेअर
मानलं रे भावा ! ऋतुराजनं केलं ट्वीटर जाम, भीमपराक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल