एमर्जिंक आशिया चषक 2023चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (23 जुलै) खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अष्टपैलू रियान पराग याने या सामन्यात एक षटक असे टाकले, ज्याला गेम चेंजर म्हटले जात आहे. रियानने या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या आणि आणि दोन धावा खर्च केल्या.
पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर सैम अयुब आणि साहिबजादा फरहान यांनी वैयक्तिक अर्धशतके करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. रियान पराग (Riyan Parag) पाकिस्तानच्या डावातील 28व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने लागेपाठ चेंडूवर दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला ओमेर युसूफ (Omair Yousuf) आणि पाचव्या क्रमांकावर आलेल्या कासिम अक्रम (Qasim Akram) यांच्या विकेट्स रियानने 28व्या षटकातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर घेतल्या. हे दोन्ही फलंदाज झेलबाद झाले. या षटकातील आपल्या प्रदर्शनासाठी रियानचे कौतुक होत आहे.
Riyan Parag the game changer!
Two wickets in 2 balls by him. pic.twitter.com/ADGAYKYCtV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 23, 2023
प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने 50 षटकांमध्ये 8 बाद … धावा केल्या. यात सर्वात मोठे योगदान राहिले तय्यब ताहिर (Tayyab Tahir) याचे. तय्यबने 71 चेंडूत 108 धावांची खेळी केली होती. भारतासाठी रियान परगाने 4 षटकात 24 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. राजवर्धन हंगरगेकर याने 6 षटकात 48 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा, मानव सुथार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (Riyan Parag the game changer! Two wickets in 2 balls by him)
महत्वाच्या बातम्या –
‘मला तिच्याशी काही देणघेण नाही…’, मैदानातील गैरवर्तनानंतर निगार सुलतानाकडून हरमनप्रीतला प्रत्युत्तर
पंचांशी वाद पडला महागात, पुढचे 24 महिने हरमनप्रीतला सावध रहावं लागणार