आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकतेच २०२१ (ICC Awards 2021) वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचे पुरस्कार जाहीर केले आहेत. चार दिवसांपूर्वी आयसीसीने आपले २०२१ वर्षातील कसोटी, वनडे व टी२० संघ जाहीर केले. त्यानंतर रविवारी (२३ जानेवारी) वैयक्तिक पुरस्कारांची घोषणा देखील करण्यात आली. २०२१ चा आयसीसी सर्वोत्तम पुरुष टी२० खेळाडू (ICC T20 Player 2021) म्हणून पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (Mohmmad Rizwan) यांची निवड करण्यात आली. तर, सर्वोत्तम महिला टी२० खेळाडू होण्याचा मान इंग्लंडच्या टॅमी ब्युमॉन्ट (Tammy Beaumont) हिला मिळाला.
Sheer Consistency, indomitable spirit and some breathtaking knocks 🔥
2021 was memorable for Mohammad Rizwan 👊
More 👉 https://t.co/9guq9xKOod pic.twitter.com/6VZo7aaRIA
— ICC (@ICC) January 23, 2022
आयसीसीने केली घोषणा
आयसीसीने रविवारी अधिकृतरित्या वर्षातील सर्वोत्तम टी२० पुरुष व महिला खेळाडूंची घोषणा केली. संपूर्ण वर्षात आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद रिझवान याला सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. त्याने मागील वर्षी २९ सामने खेळताना ७३.६६ च्या सरासरीने शानदार १३२६ धावा केल्या. पाकिस्तानला २०२१ टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीत नेण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. गतवर्षी त्याने यष्टिरक्षक म्हणून २४ फलंदाजांना तंबूत धाडले.
पाकिस्तानला मिळवून दिला होता ऐतिहासिक विजय
टी२० विश्वचषकात पाकिस्तान संघाने भारतीय संघाला प्रथमच पराभूत करण्याची किमया गतवर्षी करून दाखवली. पाकिस्तानी भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. मोहम्मद रिझवानने ५५ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली होती. कर्णधार बाबर आझमसह त्याने १५२ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजयी केलेले.
Match-winning knocks, brisk starts and some memorable moments ✨
Take a bow, Tammy Beaumont 🙇
More 👉 https://t.co/Q32mIXUBoQ pic.twitter.com/uB6dRWKMeU
— ICC (@ICC) January 23, 2022
सर्वोत्तम महिला टी२० खेळाडू बनली टॅमी
इंग्लंडची अनुभवी महिला क्रिकेटपटू टॅमी ब्युमॉन्ट हिला आयसीसीने २०२१ वर्षातील सर्वोत्तम टी२० खेळाडू म्हणून घोषित केले. तीने मागील वर्षी नऊ सामन्यांत ३०३ धावा केल्या. यात तीने तीन अर्धशतकेही झळकावली. ती इंग्लंडसाठी टी२० क्रिकेटमध्ये गतवर्षी सर्वाधिक धावा बनवणारी खेळाडू होती.
महत्त्वाच्या बातम्या-
रडू की हसू…! एकाच चेंडूवर २ वेळा गेली विकेट, विचित्र पद्धतीने रनआऊट झाला आंद्रे रसेल (mahasports.in)