भारतात वाढलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा परिणाम इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही बसला. हा हंगाम २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. यानंतर सर्व भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसत आहेत. नुकताच चेन्नइ सुपर किंग्सचा फलंदाज रॉबिन उथप्पाने एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे.
उथप्पाने त्याची पत्नी शितल तसेच अन्य काही व्यक्तींबरोबर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओला त्याने कॅप्शन दिले आहे की ‘जर तुमची पत्नी तुम्हाला अडचणीत टाकू इच्छित असेल तर तुम्ही ती भूमीका निभावण्यास तयार असता’. या व्हिडिओमध्ये रॉबिन आणि शितलसह अन्य ३ जणं डोन्ट रश या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
ऋतुराज गायकवाडने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
रॉबिन उथप्पाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर ऋतुराज गायकवाडने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले की ‘रॉबी भाई, तुम्हाला १० पैकी १० गुण.’
ऋतुराज आणि रॉबिन उथप्पा हे दोघेही चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल २०२१ हंगामात एकत्र होते. त्यामुळे त्यांनी काही दिवस एकत्र घालवले असल्याने त्यांच्यात चांगली मैत्री झालेली दिसून आली.

रॉबिन उथप्पा यंदा चेन्नईत
आयपीएल २०२१ हंगामाच्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्स संघातून ट्रेंडिंगच्या माध्यमातून रॉबिन उथप्पाला आपल्या संघात सामील करुन घेतले होते. मात्र, त्याला या हंगामात चेन्नईने खेळलेल्या ७ सामन्यांपैकी एकाही सामन्यात अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती. उथप्पाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आत्तापर्यंत १८९ सामने खेळले असून २४ अर्धशतकांसह ४६०७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात उतरताच भारतीय संघ बदलणार ८९ वर्ष जुना इतिहास
भारतीय संघांच्या दोन सामन्यांवर होता फिक्सिंगचा आरोप, आयसीसीने चौकशीअंती दिला ‘हा’ निर्वाळा
टी२० मध्ये अखेरच्या पाच षटकात सर्वाधिक ‘फोडकाम’ करणारे धुरंधर






