नवी दिल्ली । २००७ च्या टी२० विश्वचषकाबद्दल भारतीय संघाचा फलंदाज रॉबिन उथप्पाने मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने सांगितले की, भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनीच्या उत्कृष्ट रणनीतीमुळे जवळपास हारलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्धच्या बॉल आऊट सामन्यात विजय मिळविला होता.
राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्टमध्ये न्यूझीलंडचा फिरकीपटू गोलंदाज ईश सोधीबरोबर (Ish Sodhi) चर्चा करताना उथप्पाने (Robin Uthappa) म्हटले की, “आम्ही विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध कधीच हारलो नव्हतो. परंतु त्या सामन्यात आम्ही पराभवाच्या खूप जवळ गेलो होतो. तो सामना तेव्हा पलटला जेव्हा षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा खेळाडू बाद झाला होता.”
“यष्टीमागील धोनीच्या (MS Dhoni) रणनीतीमुळे भारतीय खेळाडूंना स्टंपला हिट करण्यास मदत मिळाली होती. त्यामुळे भारतीय संघ बॉल आऊटमध्ये (Ball Out) सामना जिंकण्यात यशस्वी राहिली होती,” असेही तो पुढे म्हणाला.
“बॉल आऊट सामन्यात पाकिस्तानचे प्रदर्शन पाहून असे वाटत होते की, त्याने याचा सराव केलाच नव्हता. तुम्ही ते स्पष्टपणे पाहून म्हणू शकता की, त्यांनी याची तयारी केली नव्हती. धोनीने पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमलच्या (Kamran Akmal) उलट एक गोष्ट केली होती, ज्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्याचा फायदा झाला. बॉल आऊट दरम्यान कामरान त्या जागी उभा होता, जिथे साधारणपणे एक यष्टीरक्षक उभा राहतो. तर धोनी यष्टीरक्षकाच्या जाग्यावर न थांबता यष्टीच्या जवळ थांबला होता,” असेही बॉल आऊटबद्दल बोलताना उथप्पा म्हणाला.
२००७ च्या टी२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तानदरम्यान ग्रूप स्टेजमधील सामना बरोबरीत सुटला होता. सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १४१ धावा केल्या होत्या. त्यावेळी सुपर ओव्हरचा नियम नव्हता आणि सामन्याचा निर्णय बॉल आऊटने घेतला जात होता. यादरम्यान दोन्ही संघांचे गोलंदाज स्टंपला हिट करत होते आणि ज्या संघाने सर्वाधिकवेळा स्टंपला हिट केले असेल त्या संघाला विजयी घोषित केले जात होते.
भारताकडून बॉल आऊट सामन्यात विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि उथप्पाने गोलंदाजी केली होती. तसेच तिघांनीही स्टंपला हिट केले होते. तर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आपले तिन्ही चेंडू मिस केले होते. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने बॉल आऊटने तो सामना आपल्या नावावर केला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-युवराज सिंगची इंस्टाग्राम स्टोरी पाहिलीय का? तुम्हालाही येईल हसू…
-जगातील सर्वात महागडे अंपायर; पगाराच्या रक्कम ऐकून व्हाल अवाक्
-भारताला कसोटीत पराभूत करणाऱ्या केन विलियम्सनच्या कर्णधारपदावर आता गदा






