पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी नेहमीच त्याच्या विवादास्पद वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. बुधवारी (2 नोव्हेंबर) भारताने टी-20 विश्वचषकात बागंलादेशविरुद्धचा सामना 5 धावांनी नावावर केला. या विजयानंतर भारताचे विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात त्यांची जगा जवळपास पक्की केली आहे. भारताने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले असले तरी, शाहिद आफ्रिदीच्या मते भारताला जिंकवण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर अनेकजण त्याच्यावर टीका करत आहेत. अशातच बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने स्वतःच्या संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आफ्रिदी एक मोठा खेळाडू राहिला असला, तरी मैदानाबाहेर केलेल्या वक्तव्यांमुळे देखील तो चर्चेत राहिला आहे. भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर देखील त्याने अशाच प्रकारे एक विवादास्पद वक्तव्य केले. आफ्रिदीच्या मते टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य सामन्यासाठी आयसीसी भारतीय संघाला मदत करत आहेत. आफ्रिदीच्या गंभीर आरोपांवर आता बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रॉजर बिन्नी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “हे योग्य नाहीये. मला असे नाही वाटत की, आयसीसी आमची बाजू घेत आहे. सर्वांसोबत एकसमान व्यावहार होत असतो. असे एकदाही झाले नाहीये, ज्यामुळे तुम्ही असे म्हणू शकाल. आम्हाला इतर संघांपेक्षा कोणती गोष्ट वेगळी मिळत आहे? भारत क्रिकेटचे पावरहाऊस आहे, पण आम्हा सर्वांसोबत एकसमान वर्तन केले जाते”
दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना खूपच रोमांचक झाला. भारतीय संघाने यात विजय मिळवल्यानंतर शाहिन आफ्रिदी मात्र नाराज झाला. माध्यमांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, “तुम्ही पाहू शकत होता, मैदान ओले होते. पण आयसीसीचा कल भारतीय संघाकडे आहे. त्यांना काहीही करून भारताला उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन जायचे आहे. पंच देखील तेच होते, ज्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भूमिका पार पाडली होती. या पांच्यांना सर्वोश्रेष्ठ पंचांचा पुरस्कार दिला जाईल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही विराट कोहली…
विराटचा ३४वा वाढदिवस, वाचा माजी कर्णधाराचा सचिनच्या आकडेवारीसोबत तुलनात्मक आढावा
विराट कोहलीचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास…!!