---Advertisement---

जगातील सर्वात महान टेनिसपटू दरवर्षी का देतो बॉलबॉयला पिझ्झा पार्टी? काय आहे नक्की रहस्य?

On: सोमवार, ऑगस्ट 8, 2022 3:47 PM
---Advertisement---

स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आज ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररचा जन्म स्विझर्लंडमधील बेसल येथे झाला. बेसल शहरात टेनिसमधील स्विस इनडोअर बेसल ही स्पर्धा होते.

विशेष म्हणजे या स्पर्धेत जेव्हाही फेडरर अंतिम सामना खेळतो तेव्हा तो बॉलबॉय आणि गर्ल यांना पिझ्झा पार्टी देतो. त्याने ही प्रथा जवळजवळ १३ वर्षांपासून कायम ठेवली आहे.

बेसल हे फेडररचे घरेलू मैदान आहे. या मैदानावर तो वयाच्या ११ व्या वर्षी बॉलबॉय होता. तेव्हा तो सायकलवर या मैदानावर यायचा. त्याचवेळेस या स्पर्धेतील ११९३ सालच्या अंतिम फेरीतील मिचेल स्टिच विरुद्ध स्टीफन एडबर्ग यांच्या सामन्यादरम्यानही तो बॉलबॉय होता.

त्यामुळे फेडरर म्हणतो,’ मी तेव्हाही बॉलबॉय होतो आणि मी कायमच असेल.’

त्यामुळेच फेडरर जेव्हाही इथे जिंकतो किंवा पराभूत होतो तेव्हा तो सगळ्या बॉलबॉय आणि गर्लला पिझ्झा पार्टी देतो आणि स्वतःसुद्धा या पार्टीत सामील होतो. ही पिझ्झा पार्टी म्हणजे त्या सगळ्या बॉलबॉय आणि गर्लसाठी एक आनंदाची पर्वणी असते. त्याचबरोबर फेडरर या बॉलबॉय आणि गर्ल यांना एक मेडलही देतो.

https://www.instagram.com/p/uodRg1Av3r/

https://www.instagram.com/p/BpfUQFoAueV/

आज (८ ऑगस्ट) टेनिसविश्वातील दिग्गज फेडरर १९९७पासून प्रथमच तो एटीपी क्रमवारीशिवाय त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

INDvsZIM। ‘भारताच्या पुढील दौऱ्याचे वेळापत्रक आणि बरंच काही…’, फक्त एका क्लिकवर

भारतीय बुद्धीबळाचा बादशाह आता जगावर करणार राज्य! विश्वनाथन आनंद यांना ‘फिडो’मध्ये मिळाली विशेष जबाबदारी

VIDEO | लिविंगस्टोनने पाडला षटकारांचा पाऊस, ‘द हंड्रेड’मध्ये राशिद खानची धुलाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment