बहुप्रतिष्टित इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईने 5 विकेटने विजय मिळवत किताब आपल्या नावावर केला. मुंबईचा हा आयपीएल कारकिर्दीतील 5 वा किताब होता. हे पाचही किताब जिंकवण्यात मुंबईच्या दोन फलंदाजांनी मोलाची कामगिरी पार पडली.
रोहित आणि पोलार्ड या दोन खेळाडूंचा मुंबईने जिंकलेल्या पाचही अंतिम सामन्यात होता सहभाग
रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईने हा सामना जिंकून आयपीएल 2020 चा अंतिम सामना जिंकून आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा किताबावर नाव कोरले.याआधी मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 या वर्षी किताब जिंकला होता. या पाचही हंगामातील अंतिम सामन्यात रोहित शर्मा आणि कायरान पोलार्ड हे दोघेही प्लेयिंग इलेव्हनचा भाग होते. या दोघांव्यतिरिक्त मुंबई संघातील इतर कोणताही खेळाडू या पाचही हंगामातील अंतिम सामन्यात संघाचा भाग नव्हता.
सन 2013
सन 2013 साली मुंबईने अंतिम फेरी गाठली होती. या सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्जचा 23 धावांनी पराभव केला आणि पहिला किताब जिंकला होता. या सामन्यात पोलार्डने 60 धावा केल्या होत्या तर रोहित 2 धावा करून बाद झाला होता.
सन 2015
सन 2015 साली अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईचा 41 धावांनी पराभव करत आयपीएलचा दुसरा किताब जिंकला. या सामन्यात रोहितने 50 धावा केल्या तर पोलार्ड 36 धावा करून तंबूत परतला.
सन 2017
सन 2017 मध्ये राईजिंग पुणे सुपरजायंटचा 1 धावांनी पराभव करत मुंबईने तिसऱ्यांदा किताबावर नाव कोरले.या सामन्यात रोहितने 24, तर पोलार्डने 7 धावा केल्या होत्या.
सन 2019
सन 2019 मध्ये चौथा किताब जिंकण्यासाठी या संघाने चेन्नईचा 1 धावानी पराभव केला. या सामन्यात पोलार्डने नाबाद 41 धावा केल्या होत्या तर रोहितला अवघ्या 15 धावाच करता आल्या.
सन 2020
सन 2020 मध्ये मुंबईने दिल्लीचा 5 गडी राखून पराभव करत 5 वा किताब जिंकला. या सामन्यात रोहितने मुंबईकडून सर्वाधिक 68 धावा केल्या, तर पोलार्ड 9 धावा करून तंबूत परतला.
महत्त्वाच्या बातम्या –
संपुर्ण यादी- आयपीएल २०२०मध्ये या खेळाडूंना मिळाले अवॉर्ड्स!
काय सांगता ! १३ वर्षात ६ आयपीएल विजेतेपदे; रोहित बनला आयपीएलचा बेताज बादशाह
IPL – आत्तापर्यंतचे ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ पुरस्कार मिळवणारे खेळाडू