---Advertisement---

वर्ल्डकपसाठी रोहितचा कुलदीपला सल्ला! म्हणाला, “गुपचूप बॉलिंग कर आणि…”

On: मंगळवार, जानेवारी 20, 2026 6:38 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२६चा संग्राम येत्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत आहे. भारत आणि श्रीलंकेला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यासाठी भारताबरोबर बाकी सहभागी संघ चांगलेच तयारीला लागले आहेत. २०२४मध्ये भारताला टी२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्माकडे खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या कुलदीप यादवला देण्यासाठी महत्वाचा सल्ला आहे.

रोहित जेव्हा कर्णधार होता तेव्हा कुलदीप वारंवार डीआरएसची (DRS) मागणी करे. यामुळे त्या दोघांमध्ये मतभेदही झाले आहेत. तसेच कुलदीप हा तोच गोलंदाज ज्याला रोहित अधिकाधिक डीआरएस घेण्यास मनाई करत असे. “त्याच्यासाठी माझ्याकडे कोणताच सल्ला नाही. त्याने केवळ गोलंदाजी करावी आणि प्रत्येक चेडूंवर हरकत घेऊ नये”, असे रोहितने जतिन सप्रुच्या ‘कॅप्टन्स रोड मॅप’ कार्यक्रमामध्ये म्हटले आहे.

कर्णधार असताना रोहितने कुलदीपच्या म्हणण्यानुसार अनेकदा डीआरएस घेतला होता. यामध्ये त्याचे निर्णयही चुकले होते. तसेच नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याचा प्रत्यय आला. यामध्ये एका सामन्यात कुलदीपने पुन्हा एकदा डीआरएसची मागणी केली होती. तेव्हा रोहितने कर्णधार नसतानाही त्याला मान्यता दिली नाही. त्याच्या या निर्णयाला विराट कोहली आणि केएल राहुल यांनीही सहमती दर्शवली होती. शुबमन गिलनेही त्याला होकार दिला.

“टी२० विश्वचषकासाठी संघात कुलदीपसोबत वरूण चक्रवर्तीला खेळवणे योग्य, मात्र ते एका वेगवान गोलंदाजांला वगळूनच. कदाचित भारत तीन वेगवान आणि दोन फिरकीपटूसोबत सामना नाही जिंकू शकणार”, असेही रोहितने पुढे म्हटले आहे.

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोहमद शमी आणि हार्दिक पंड्या यांच्याबरोबर कुलदीप, चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा यांनाही खेळवले होते. ही स्पर्धा दुबईमध्ये झाली होती, मात्र भारतात स्थिती वेगळी आहे. यामुळे सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असेही रोहितने सुचविले.

टी२० विश्वचषकात भारत पहिला सामना ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १२ फेब्रुवारीला नामिबिया विरुद्ध आणि १५ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध साखळी सामने खेळणार आहे. शेवटचा साखळी सामना १८ फेब्रुवारीला नेदरलॅंड्स विरुद्ध खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---