---Advertisement---

जेव्हा कॅप्टन्सीवरुन काढलं तेव्हा रोहित अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये काय करत होता?

On: शनिवार, डिसेंबर 16, 2023 8:14 PM
Rohit Sharma Ritika Sajdeh
---Advertisement---

रोहित शर्मा आगामी आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसेल. चाहत्यांसाठी नक्कीच ही बातमी निराशाजनक आहे. हार्दिक पंड्या याला आयपीएल 2024 साठी मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले आहे. अशात रोहित शर्माबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. पण ताजी माहिती अशी आहे की, रोहितला कर्णधारपदावरून हटवले गेले, तेव्हा तो अंबानिंच्या इंडरनॅशनल स्कुलमध्ये होता.

मुंबई इंडियन्स (Mumbai India) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासातील एक यशस्वी फ्रँचायझी राहिली आहे. कर्णधार रोहित शर्मा याचे मुंबई इंडियन्सच्या यशामध्ये सर्वात मोठे योगदान राहिले आहे. त्याच्याच नेतृत्वात संघाने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. असे असले तरी, आगामी हंगामाआधी त्याच्याकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले गेले. शुक्रवारी (15 डिसेंबर) हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला मुंबईचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले गेले.

माध्यमांतील वृत्तांनुसार चाहत्यांप्रमाणे स्वतः रोहित देखील या निर्णयामुळे निराश आहे. रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह यांचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. शुक्रवारी रोहितला कर्णधारपद काढून घेतल्यानंतर हे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले असून दोघेही निराश आणि चिंतेत दिसत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुक्रवारी सायंकाळी रोहित आणि रितिका उपस्थित होते. भारतीय कर्णधाराची मुलगी समायरा या शाळेत शिकत असून शाळेच्या वार्षीक स्नेहसम्मेलनासाठी भारतातील अनेक नामवंत चेहरे याठिकाणी उपस्थित होते. असे असले तरी, रोहित आणि रितिका मात्र, संपूर्ण कार्यक्रमादरम्यान आपल्याच विचारांमध्ये हरवलेले होते. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचे व्हायरल झाले आहेत.

 

दरम्यान, हार्दिक पंड्या हादेखील मुळचा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे. 2015 मध्ये त्याने मुंबईकडूनच आयपीएल पदार्पण केले होते. आपल्या आयपीएल प्रदर्शनाच्या जोरावर हार्दिकने पुढे भारतीय संघात स्थान पक्की केली. आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सने हार्दिकला लिलिवात 15 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आणि संघाचा कर्णधार देखील बनवले. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने 2022 हंगामाचे विजेतेपद, तर आयपीएल 2023 मध्ये उपविजेतेपद पटकावले. आगामी हंगामात मात्र तो पुन्हा मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आहे. हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स काय कमाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rohit Sharma and Ritika Sajdeh is at Dhirubhai Ambani International School when hardik pandya become captain of mumbai indians)

महत्वाच्या बातम्या – 
बापरे! लिओनल मेस्सीच्या 6 जर्सींना लिलावात मिळाले तब्बल 65 कोटी
अखेर मुंबईकर जाफरने सोडले मौन, रोहितला कर्णधारपदावरून हटविल्यावर निशाणा साधत म्हणाला, ‘इतक्या लवकर…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---