पुणे, दि. 15 डिसेंबर 2023 – डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या अखिल भारतीय आंतर क्लब वॉटर पोलो कटककर करंडक’ स्पर्धेत कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए), इंडियन नेव्ही, ईस्टर्न रेल्वे, वेस्टर्न रेल्वे या संघांनी आगेकूच केली.
डेक्कन जिमखान्याच्या टिळक तलावावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए) संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत रिलायन्स रायगडचा 10-5 असा पराभव केला. विजयी संघाकडून आशिष सरदार 1, सोमेन मंडल 3, सौविक ढाली 2, शुभदीप हळदर 1, एस के अल्विरिझा 2, विश्वजीत दत्ता 1 यांनी गोल केले. रिलायन्स रायगडकडून सर्वेश माने 1, ओंकार माळी 2, सुजल भोईर 1, मनीष कोकाटे 1 यांनी गोल केले.
चुरशीच्या लढतीत प्रणव म्हात्रे 2, सुमित प्रसाद 1, मिधुन एजे 2, वैभव कुटे 5, संदीप डीएस 1 यांनी केलेल्या केलेल्या गोलाच्या जोरावर इंडियन नेव्ही संघाने एअरफोर्स संघाचा 11-8 असा पराभव केला. डेक्कन जिमखाना संघाने खिद्दरपूर स्विमिंग क्लब संघावर 10-4 असा विजय मिळवला.. डेक्कन जिमखाना संघाकडून बाळासाहेब भिसे 1, ऋतुराज बिडकर 1, मनीष खोमणे 3, गौरव महाजनी 2, शुभम धायगुडे 1, पियुष सूर्यवंशी 2 यांनी सुरेख कामगिरी केली.
निकाल: साखळी फेरी:
इंडियन नेव्ही: 8(अनंतू जीएस 2, प्रणव म्हात्रे 2, सुमित प्रसाद 1, भागेश कुटे 2, वैभव कुठे 1) वि.वि.सेंट्रल रेल्वेः 5 (आनंदू गोपन 1, रोहित बीएस 1, उदय उत्तेकर 2, निमिष निजामपूरकर 1);
कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए): 10 (सोमेन मोंडल 1, सौविक ढाली 3, एस के अल्विरिझा 3, बिस्वजीत दत्ता 3) वि.वि.एअरफोर्स: 8(नितीश यूएन 1, राज पाटील 1, सिबिन वर्गीस 4, प्रवीण जीके 2);
डेक्कन जिमखाना: 10(बाळासाहेब भिसे 1, ऋतुराज बिडकर 1, मनीष खोमणे 3, गौरव महाजनी 2, शुभम धायगुडे 1, पियुष सूर्यवंशी 2) वि.वि.खिद्दरपूर स्विमिंग क्लब: 4 (अनिर्बन मंडल 1, बिस्वजीत नसकर 2, माणिक मोंडल 1);
अमरावती: 12 (आदित्य थेटे 1, हार्दिक प्रजापती 1, पार्थ अंबुलकर 1, जयेश वानखेडे 5, उत्कर्ष थोरात 1, अश्विन कलोती 1, आलोक देशमुख 1, मंथन शिवणीकर 1) वि.वि.राजकोट:1(युग प्रजापती 1);
कलकत्ता स्पोर्ट्स असोसिएशन (सीएसए):10(आशिष सरदार 1, सोमेन मंडल 3, सौविक ढाली 2, शुभदीप हळदर 1, एस के अल्विरिझा 2, विश्वजीत दत्ता 1) वि.वि.रिलायन्स रायगड:5 (सर्वेश माने 1, ओंकार माळी 2, सुजल भोईर 1, मनीष कोकाटे 1)
इंडियन नेव्ही: 11(प्रणव म्हात्रे 2, सुमित प्रसाद 1, मिधुन एजे 2, वैभव कुटे 5, संदीप डीएस 1) वि.वि.एअरफोर्स: 8 (नितेश यूएन 1, सिबिन वर्गीस 1, जिनिन के नायर 1, प्रवीण जीके 5);
मिदनापूर स्विमिंग क्लब: 5(अरित्र दास 2, सायन बोस ३) वि.वि.राजकोट:2(युग प्रजापती 2);
सेंट्रल रेल्वे: 10(आनंदू गोपन 1, रणजीत क्षोत्रिय 1, रोही बीएस 2, उदय उत्तेकर 3, सिद्धार्थ जेएस 2, निमिश निजामपूरकर 1) वि.वि.खिद्दरपूर: 2 (अनिर्बान मंडल 1, बिस्वजीत नसकर 1);
पश्चिम रेल्वे: 8(अश्विनीकुमार कुंडे 2, श्रेयस वैद्य 3, अक्षयकुमार कुंदे 1, करण शुक्ला 1, तेसज पठारे 1) वि.वि.ईस्टर्न रेल्वे:3(चंदन सरकार 2, कुमारजीत दत्ता 1);
इंडियन नेव्ही: 12 (अनंतू जीएस 1, प्रणव म्हात्रे 2, सुमित प्रसाद 1, भागेश कुटे 1, मिधुन एजे 1, वैभव कुटे 2, अमल एमबी 2, अंकित प्रसाद 1, संदीप डीएस 1) वि.वि.रिलायन्स रायगड: 4 (प्रेम पाटील 3 , सुजय भोय 1);
एअरफोर्स: 9(राज पाटील 3, वेदांत कुटे 3, प्रवीण जीके 3) वि.वि.खिद्दरपूर: 3(अभिषेक प्रसाद 1, प्रीतम देबनाथ 2).
महत्वाच्या बातम्या –
रोहितला कर्णधार पदावरून काढल्याचं सर्वाधिक दु:ख धोनीच्या चेन्नईला, पोस्ट चर्चेत
कॅप्टन सूर्या अन् अर्शदीपचं वाजलं? टीम इंडियाच्या बसमध्येच गोलंदाजावर चिडला Sky, पाहा Video