भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून सोमवारी (14 नोव्हेंबर) सर्व क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. वरिष्ठ टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उज्वल करणाऱ्या 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येतील. तसेच प्रशिक्षकांसाठीच्या द्रोणाचार्य पुरस्कारांची देखील घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचे प्रशिक्षक व मुंबई क्रिकेट वर्तुळातील मोठे नाव असलेल्या दिनेश लाड यांना देखील द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
Dronacharya Award in Lifetime Category (Coaches) – Shri Dinesh Jawahar Lad 👏
The President of the Mumbai Cricket Association Shri @Amolkk1976 would like to congratulate him on behalf of Mumbai Cricket Association for achieving this incredible feat 🙌
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) November 14, 2022
द्रोणाचार्य पुरस्कार 2022 मध्ये दिनेश लाड यांचे नाव आल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांचे अभिनंदन केले. मागील जवळपास 26 वर्षांपासून क्रिकेट प्रशिक्षण देणारे लाड हे बोरिवली येथे श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे आपली अकादमी चालवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत तब्बल 85 रणजीपटू घडले आहेत. सध्या भारतीय संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा हा देखील त्यांचा शिष्य आहे. तसेच भारतीय संघासाठी खेळणाऱ्या शार्दुल ठाकूर यांनी देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली क्रिकेटची बाराखडी गिरवली होती. याव्यतिरिक्त त्यांचा स्वतःचा मुलगा व मुंबईचा माजी कर्णधार सिद्धेश लाड व सध्या मुंबई क्रिकेट संघात शानदार कामगिरी करणारा सुवेद पारकर यांना घडवण्यातही लाड यांचा हात आहे.
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते व भारतासाठी जवळपास 12 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडवणारे दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर हे लाड यांचे प्रशिक्षक होते. दिनेश लाड हे केवळ क्रिकेट प्रशिक्षक नव्हेतर ग्रामीण व शहरी भागापासून गुणवत्ता हेरण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या भारतीय संघात खेळत असलेल्या शार्दुल ठाकूर याला त्यांनी मुंबईमध्ये राहण्याची सोय नसताना आपल्या घरात आश्रय देत क्रिकेट प्रशिक्षण दिले होते.
(Rohit Sharma And Shardul Thakur Coach Dinesh Lad Felicitated By Dronacharya Award)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे पाकिस्तानी पत्रकाराचे ट्वीट, तर दुसरीकडे मिश्राजींचा ‘विराट’ रिप्लाय, ‘अशी’ केली बोलती बंद
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’