न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी संघाला वेगवान सुरुवात दिली. रोहितने 85, तर शुबमन गिलने 72 चेंडूत स्वतःचे शतक पूर्ण केले. संघाला वेगवान सुरुवात दिल्यानंतर दोघेही त्यांचा हा डाव पुढे घेऊन जातील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र रोहितने 101, तर गिलने 103 धावा करून विकेट गमावली. असे असले तरी, या दोघांच्या नावावर एक मोठा विक्रम मात्र नोंदवला गेला.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात संघाला अपेक्षित सुरुवात दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 212 धावांची भागीदारी पार पडली. भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी केली गेलेली ही पाचवी सर्वात मोठी भागीदारी ठरली. यादीत पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची सलामीवीर जोडी आहे. या दोघांनी केनिया संघाविरुद्ध 258 धावांची भागीदारी केली होती, जी भारताच्य वनडे इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. यादीत दुसऱ्या क्रमांकावर देखील सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचेच नाव आहे. श्रीलंका संघाविरुद्ध या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 252 धावांची भागीदारी केली होती, ज्यासाठी यादीत दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे त्यांचे नाव आहे.
शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी श्रीलंका संघाविरुद्ध वनडे सामन्यात 231 धावांची भागीदारी केली होती. यासाठी धवन आणि रहाणेचे नाव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि केएल राहुल () यांचे नाव आहे. रोहितने गिलच्या आदीत राहुलसोबत वेस्ट इंडीविरुद्ध 227 धावा केल्या होत्या. आता रोहित आणि गिल जोडी या यादीत नव्याने सामील झाली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी भागीदारी करणाऱ्या भारतीय सलामीवीर जोड्या –
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली – 258 (विरुद् केनिया)
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली – 252 (विरुद्ध श्रीलंका)
शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे – 231 (विरुद्ध श्रीलंका)
रोहित शर्मा आणि केएल राहुल – 227 (विरुद्ध वेस्ट इंडीज)
रोहित शर्मा आणि शुबमन गिल – 212 (विरुद्ध न्यूझीलंड)
(Rohit Sharma and Shubman Gill make India’s fifth-highest opening partnership in ODI cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
इंदोरमध्ये घोंघावले ‘हिटमॅन’ वादळ! तब्बल 1100 दिवसांनी रोहितचे वनडे शतक