जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून सुरू होत आहे. तसेच, या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली आपल्या नावावर एक खास विक्रम करतील. या अंतिम सामन्यामध्ये दोघांच्या प्रवेशानेच त्यांच्या नावावर खास विक्रम नोंदवला जाईल. या प्रकरणात, हे दोन्ही दिग्गज खेळाडू भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंग धोनीला मागे टाकतील.
खरं तर, या विक्रमाकडे लक्ष दिल्यास धोनी, रोहित आणि कोहली हे तिन्ही खेळाडू या यादीमध्ये अव्वल स्थानी नाहीत. यादीमध्ये अव्वल स्थानी भारतच्या एका दिग्गज खेळाडूचे नाव आहे. तर चला जाणून घेऊ रोहित आणि कोहली धोनीचा कोणता विक्रम मोडीत काढणार आहेत.
यादीमधील अव्वल स्थानी आहे युवराज सिंग
भारतीय संघातील सर्वांत जास्त आयसीसी अंतिम सामने खेळणारा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून युवराज सिंग आहे. 2000 मध्ये आयसीस नॉकआउट, 2002 अजिंक्यपद ट्रॉफी, 2003 विश्वचषक, 2007 टी 20 विश्वचषक अंतिम सामना, 2011 अंतिम सामना, 2014 टी 20 विश्वचषक अंतिम सामना आणि 2017 मधील अजिंक्यपद ट्रॉफी यासह एकूण 7 आयसीसीचे अंतिम सामने खेळले आहेत. या यादीमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी दुसऱ्या स्थानावर आहेत. तिघांनीही आयसीसीमध्ये आतापर्यंत एकूण 5-5 अंतिम सामने खेळले आहेत. म्हणजेच जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करताच रोहित (Rohit Sharma) आणि विराट (Virat Kohli) धोनीला (MS Dhoni) मागे सोडू शकतात.
भारतासाठी सर्वाधिक आयसीसी अंतिम सामने खेळणारे खेळाडू
1. युवराज सिंग – 7 अंतिम सामने (2000, 2002, 2003, 2007, 2011, 2014, 2017)
2. एमएस धोनी – 5 अंतिम सामने (2007, 2011, 2014, 2013, 2017)
3. विराट कोहली – 5 अंतिम सामने (2011, 2013, 2014, 2017, 2021)
4. रोहित शर्मा – 5 अंतिम सामने (2007, 2013, 2014, 2017, 2021)
5. सचिन तेंडुलकर – 4 अंतिम सामने (2000, 2002, 2003, 2011)
6. रवींद्र जडेजा- 4 अंतिम सामने (2013, 2014, 2017, 2021)
7. रविचंद्रन अश्विन – 4 अंतिम सामने (2013, 2014, 2017, 2021)
अश्विन आणि जडेजा सचिन तेंडुलकरला देऊ शकतात मात
मात्र, जर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) या शानदार अंतिम सामन्यात प्रवेश करताच ते सचिन तेंडुलकरला मागे सोडू शकतात. अश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी चार आयसीसी अंतिम सामने खेळले आहेत. त्याचवेळी सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आयसीसीचे चार अंतिम सामने खेळले आहेत. अंतिम सामन्यामध्ये जडेजा आणि अश्विन खेळणे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे हे दोघेही मास्टर ब्लास्टर ऑस्ट्रेलियाला मात देऊ शकतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हे दोघे शेवटच्या वेळी 2021 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात एकत्र खेळले होते. तसेच, दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाची ही अंतिम फेरी असू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…